मोटारसायकल अन् रिक्षाच्या धडक, दोघे जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 11:27 IST2021-07-05T11:27:32+5:302021-07-05T11:27:59+5:30

स्थानिक रहिवाशांनी तातडीने धाव घेत बचावकार्य केले. तिघांनाही उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे

Motorcycle and rickshaw hit, both injured in thane | मोटारसायकल अन् रिक्षाच्या धडक, दोघे जखमी

मोटारसायकल अन् रिक्षाच्या धडक, दोघे जखमी

ठळक मुद्देस्थानिक रहिवाशांनी तातडीने धाव घेत बचावकार्य केले. तिघांनाही उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे

ठाणे - ठाण्यातील पाचपाखडी येथील नितीन कंपनीजवळ एका मोटारसायकलने रिक्षाला दिलेल्या धडकेत मोटारसायकल स्वार गणेश पवार आणि त्यांच्यामागील सहप्रवासी आशुतोष कसबे हे जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात रिक्षाचालक रवींद्र दिघे हेही जखमी झाले आहेत.

स्थानिक रहिवाशांनी तातडीने धाव घेत बचावकार्य केले. तिघांनाही उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. दुचाकीस्वार गणेश पवार (२८, रा. धर्मवीर नगर, ठाणे) यांच्या डोक्याला आणि  हाताला किरकोळ दुखापत झाली. मागील सहप्रवासी आशुतोष कसबे (३०) यांच्या डाव्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे. दोघांनाही उपचारासाठी प्रगती हॉस्पिटल, वागळे इस्टेट, ठाणे (प) येथे दाखल करण्यात आले आहे.
 

Web Title: Motorcycle and rickshaw hit, both injured in thane