घोटाळ्याप्रकरणी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मोहन पाटील यांना पोलीस कोठडी

By धीरज परब | Published: April 6, 2024 12:02 PM2024-04-06T12:02:03+5:302024-04-06T12:03:03+5:30

आर्थिक गुन्हे शाखेने अटक करून ठाणे न्यायालयात हजर केले असता ८ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे . 

mohan patil of ncp ajit Pawar group in police custody in case of scam | घोटाळ्याप्रकरणी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मोहन पाटील यांना पोलीस कोठडी

घोटाळ्याप्रकरणी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मोहन पाटील यांना पोलीस कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - भाईंदरच्या अभिनव शेतकरी शिक्षण संस्थेतील आर्थिक घोटाळ्या प्रकरणी फरार असलेले तत्कालीन कार्याध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान जिल्हाध्यक्ष मोहन पाटील हे अखेर पोलिसांना शरण आले . त्यांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक करून ठाणे न्यायालयात हजर केले असता ८ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे . 

मोहन पाटील हे संस्थेचे कार्याध्यक्ष असताना त्यांनी विद्यार्थी आदींना संगणक प्रशिक्षण , डिजिटल ओळखपत्र देणे व संगणकांची देखभाल दुरुस्ती यासाठी रिंग इंडिया या ठेकेदार कंपनीला वार्षिक १ कोटी ३८ लाख नुसार ५ वर्षां करीता ६ कोटी ९० लाखांचा ठेका दिला होता . शालेय पोषण आहारचे काम स्वतःच्या  मधुमोहन महिला बचत गट ला परस्पर दिला . शासनाचा योजनेतील तांदूळ विकला . बचत गटाच्या अध्यक्षेनेच पोलिसांना याची आपल्याला माहिती नाही व पाटील यांनी कोऱ्या धनादेशावर स्वाक्षऱ्या घेतल्याचे सांगितले होते .  परंतु बचत गटाने सुमारे ८५ लाख रुपये संस्थेच्या खात्यात जमा केले होते . 

२०१९ मध्ये नवघर पोलीस ठाण्यात तत्कालीन कार्याध्यक्ष मोहन पाटील , संस्थेचे लेखापाल प्रशांत नरेश पाटील ,  रिंग इंडिया चे भागीदार न्यूमान रेहमान आणि कुणाल गुडेकर , संस्थेचे वासुदेव पाटील , गुरुनाथ पाटील , दिलीप पाटील , शरद पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता .

तर सदर गुन्ह्याचा तपास मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या  आर्थिक गुन्हे शाखे कडे वर्ग झाला होता .  उच्च न्यायालयाने २३ फेब्रुवारी २०२४ रोजी मोहन पाटील व प्रशांत पाटील यांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले तर अन्य आरोपीना जामिन मंजूर केला होता . प्रशांत पाटील याने अटकपूर्व जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला असता ११ मार्च रोजी तो फेटाळून लावण्यात आला . त्यामुळे प्रशांत पाटील याने १५ मार्च रोजी आर्थिक गुन्हे शाखेत शरणागती पत्करली . तर मोहन पाटील फरार होते . अखेर शुक्रवार ४ ५ एप्रिल रोजी पाटील हे पोलिसांना शरण आल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली .  शुक्रवारी दुपारी त्यांना ठाणे  न्यायालयात हजर करण्यात आले . न्यायालयाने ८ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे .  

Web Title: mohan patil of ncp ajit Pawar group in police custody in case of scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.