शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
3
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
4
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
5
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
6
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
7
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
10
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
11
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
12
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
13
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
14
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
15
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
16
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
17
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
18
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
19
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
20
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

मोदींचे होणार भिवंडीत लॅण्डिंग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 07:07 IST

हेलिपॅडसाठी बापसईनजीकची जागा निश्चित : सरकारी यंत्रणा अंग झाडून कामाला

कल्याण : मेट्रो रेल्वे प्रकल्प व पंतप्रधान आवास योजनेच्या घरांचे भूमिपूजन करण्यासाठी १८ डिसेंबर रोजी कल्याण दौऱ्यावर येणाºया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिपॅडसाठी अखेर भिवंडीतील जागा निश्चित करण्यात आली आहे. कल्याण-पडघा मार्गावरील बापसई गावानजीकच्या मोकळ््या जागेत मोदींचे हेलिकॉप्टर लॅण्ड होणार असून, दौºयाच्या तयारीसाठी सरकारी यंत्रणा अंग झाडून कामाला लागली आहे.

पंतप्रधानांच्या हेलिपॅडसाठी योग्य जागा शोधताना यंत्रणेची चांगलीच दमछाक झाली. मोदींचा कार्यक्रम कल्याण पश्चिमेतील फडके मैदानावर होणार आहे. सुरक्षेचे सर्व निकष पूर्ण करणारे मोकळे मैदान या भागात उपलब्ध नसल्याने हेलिपॅडसाठी कल्याण-पडघा मार्गावरील बापसई गावानजीकची मोकळी जागा निश्चित करण्यात आली आहे. हेलिकॉप्टरच्या लॅण्डिंग आणि टेक आॅफमध्ये अडथळा होऊ नये, यासाठी तिथे लोंबकळणाºया विजेच्या तारा हटविण्याचे काम वीज वितरण कंपनीने केले. बापगावपासून गांधारी पुलावरुन कल्याणच्या दिशेने लालचौकीनजीक असलेल्या फडके मैदानात मोदी येणार आहेत. बापगाव हे भिवंडी तालुक्यात येते. गांधारी खाडी पुलावरुन कल्याण डोंबिवली महापालिकेची हद्द सुरु होते. महापालिकेने गांधारी ते लालचौकीपर्यंतच्या डांबरी रस्त्याची डागडुजी केली आहे. काही ठिकाणी तातडीने डांबरीकरण करुन घेण्यासही सुरुवात केली आहे. आयुक्त गोविंद बोडके यांनी शुक्रवारी या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. या रस्त्यावरील गतीरोधक हटविण्याचे कामही करण्यात आले आहे. पंतप्रधानांच्या ताफ्यातील वाहनांना गतीरोधकांमुळे अडथळा होऊ नये, यासाठी गांधारी ते लाल चौकी रस्त्यावरील गतीरोधक हटवण्यात आले आहेत. या परिसरातील हातगाड्या, तसेच दुकानांसमोरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे प्रमुख सुनील जोशी यांनी सुरु केली आहे. पदपथावरील लहान मोठे १३७ गाळे तोडण्याची कारवाई केली आहे.रस्ते चकाचकच्कल्याण-भिवंडी बायपासवरील दुभाजक धूळ आणि वाहनांच्या धुराने काळेकुट्ट झाले होती. त्यावरील काळे पिवळे पट्टे दिसेनासे झाले असून, दुभाजकामधील झाडांभोवती कचरा साचला होता. दुभाजकाच्या बाजूने रस्त्यावर मातीचा थर साचला होता. हे दुभाजक टँकरच्या पाण्याने धुण्याचे काम शुक्रवारी दुपारी सुरु होते.च्फडके मैदानाची क्षमता २५ हजार नागरिकांची असून, येथे दहा हजार खुर्च्या आणि त्याच्यामागे काही लोक उभे राहू शकतात. कल्याणात भाजपाचा मेळावा पार पडला. सभास्थळी ५० हजार कार्यकर्ते जमवण्याचे आवाहन यावेळी नेत्यांनी केले. मोठी गर्दी झाल्यास ती सांभाळण्याचे आव्हान सुरक्षा यंत्रणेपुढे राहणार आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार