डोंबिवलीत मोबाइल चोरांचा सुळसुळाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 01:41 IST2018-07-11T01:41:22+5:302018-07-11T01:41:35+5:30

पादचाऱ्यांचे मोबाइल दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी लांबवल्याच्या चार घटना शहरात घडल्या. चोरट्यांनी या गुन्ह्यासाठी एकाच दुचाकीचा वापर केला आहे.

mobile thieves | डोंबिवलीत मोबाइल चोरांचा सुळसुळाट

डोंबिवलीत मोबाइल चोरांचा सुळसुळाट

डोंबिवली - पादचाऱ्यांचे मोबाइल दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी लांबवल्याच्या चार घटना शहरात घडल्या. चोरट्यांनी या गुन्ह्यासाठी एकाच दुचाकीचा वापर केला आहे.
पूर्वेतील दावडीगाव परिसरातून वेदप्रकाश सिंग (३२) हे रविवारी सकाळी ९ च्या सुमारास जात होते. त्यावेळी मागून दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या हातातील मोबाइल खेचून पोबारा केला. दि. ३ जुलैला सकाळी ९ च्या सुमारास विष्णू कुंभकर्ण (३२, रा. पिसवली) हे मोबाइल फोनवर बोलत युनिक चौकातून जात होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या हातातील मोबाइल लांबवला. या दोन्ही घटनांची नोंद मानपाडा पोलीस ठाण्यात झाली आहे.
तिसºया घटनेत, पूर्वेतील ९० फुटी रस्त्याने नारायणन नंबुदरी (४५) हे खंबाळपाडा रोडकडे गुरुवारी सायंकाळी ५ च्या सुमारास जात होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या हातातील मोबाइल खेचून पोबारा केला.

दोन मोबाइल लांबवले

डोंबिवली स्टेशन परिसरात दुकानात खरेदीसाठी गेलेल्या रोशनी राणे (२८, रा. सागाव) यांच्या पिशवीतील पर्समधील दोन मोबाइल चोरीला गेल्याची घटना रविवारी सायंकाळी ७ च्या सुमारास घडली. या घटनेची नोंद रामनगर पोलीस ठाण्यात झाली आहे.

Web Title: mobile thieves