शहरं
Join us  
Trending Stories
1
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
2
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
3
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
4
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
5
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
6
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
7
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
8
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
9
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
10
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
11
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
12
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
13
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
15
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
16
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
17
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
18
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
19
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
20
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले

ठामपासमोरून मनसेची कोकण बससेवा; पानसे यांची सरकारवर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 12:57 AM

कोट्यवधी रुपये खर्चून परप्रांतीयांना सोडले गावी

ठाणे : मनसेने शिवसेनेच्या नाकावर टिच्चून सोमवारी रात्री गणेशोत्सवानिमित्त कोकणच्या चाकरमान्यांसाठी ठाणे महापालिका मुख्यालयासमोरून मोफत बस सेवेचा शुभारंभ केला. या वेळी मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी कोट्यवधी रुपये खर्च करून लाखो परप्रांतीयांना त्यांच्या गावी सोडायला ठाकरे सरकार व्यवस्था करू शकते; मात्र गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची व्यवस्था करायला सरकारकडे पैसे नाहीत, अशी टीका केली. तर सरकार जिथे कमी तिथे मनसे उभी राहते, असे पक्षाचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव म्हणाले.सोमवारी २६, तर मंगळवारी १९ बस कोकणसाठी सोडण्यात आल्या. विशेष म्हणजे शिवसेनेची सत्ता असलेल्या ठाणे महापालिका मुख्यालयातून अविनाश जाधव यांना पोलिसांनी अटक केली होती. याच कारणास्तव मनसे कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या नाकावर टिच्चून ठामपा मुख्यालयासमोरूनच या बस सोडल्या.खा. विनायक राऊत यांच्या वक्तव्याला आम्ही महत्त्व देत नाही, कोकणवासी सुखरूप गावी पोहोचणे आमच्यासाठी महत्त्वाचे होते. मनसेने दिलेला शब्द पाळला. जाताना प्रवाशांचे तापमान आणि आॅक्सिजनपातळी तपासल्याचे जाधव म्हणाले. तर, पानसे यांनी परप्रांतीयांच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफ डागली. ते म्हणाले, एसटीची व्यवस्था सरकारने केली नाही, रेल्वे सुरू करण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. यामुळे नक्की सरकार कोणाचे? याचा कोकणवासीयांनी विचार करावा. या वेळी शहर सचिव नैनेश पाटणकर, महेश कदम, रवी सोनार व इतर मनसैनिक उपस्थित होते.‘...तरीही थांबणार नाही’सत्ताधारी पक्षाच्या खासदारांना जबाबदारी टाळायची आहे म्हणून ते कोकणात येऊ नका, असे सांगतात. जेव्हा मराठी सणांवर आपत्ती येते तेव्हा मनसेच उभी राहते. खोटे गुन्हे दाखल केले तरी आम्ही थांबणार नाही, असेही पानसे म्हणाले.

टॅग्स :MNSमनसे