शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
6
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
7
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
8
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
9
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
10
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
11
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
12
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
13
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
14
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
15
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
16
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
17
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
18
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
19
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
20
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर मुरुडकरच्या सहकाऱ्यांची नावे मनसे सोमवारी जाहीर करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 00:28 IST

दोषींवर कावाईची केली मागणी

ठाणे : राज्याच्या पोलीस खात्यातील भ्रष्ट कारभाराप्रमाणे महापालिकांमध्ये चालणारा भ्रष्ट कारभार उघडकीस आलाच पाहिजे. ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारीपदावर असलेल्या डॉ. राजू मुरूडकर यांनी व्हेटिंलेटर पुरविणाऱ्या ठेकेदाराकडून १५ लाख रुपयांची लाच मागून त्यापैकी पाच लाख रुपये घेताना एसीबी पथकाने रंगेहाथ पकडले आहे. यामुळे ठाणेकरांचा महापालिका कारभारावरील विश्वास उडाला आहे. मुरुडकरचा बोलविता धनी कोण, त्याच्या मागे आणखी किती जण आहेत, या सर्वांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाईची मागणी मनसे आणि भाजपने केली आहे. तसेच त्याच्या सहकाऱ्यांची नावे सोमवारी जाहीर करण्याचा इशारा पक्षाने दिला आहे.कोरोनाच्या काळात अशा पद्धतीने काम करणाऱ्या अधिकाऱ्याला सेवेतून बाहेर काढा, अशी मागणी मनसेने केली आहे. त्यातही ते कोणाच्या सांगण्यावरून लाच मागत होते. त्यांना असे कृत्य करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी अथवा सत्ताधारी बडे राजकीय नेते यापैकी कोण सांगत होते. याची माहिती ठाणेकरांसमोर आलीच पाहिजे, अशी मागणी मनसेचे विद्यार्थी सेनेचे नेते संदीप पांचगे यांनी केली आहे.कोरोनाकाळात मुंबई, नवी मुंबई येथील ज्या रुग्णालयांनी अवाजवी बिले आकारली होती त्यांनी रुग्णांच्या खात्यात ती रक्कम जमा केली. परंतु, ठाणे महापालिका क्षेत्रात डॉ. मुरुडकर यांनी रुग्णालयांना पाठिशी घातले आहे. यामुळे कित्येक रुग्णांना परतावा मिळालेला नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. कोरोना काळात डॉ. मुरुडकर याने प्रस्तावित केलेल्या निविदा तसेच केलेली खरेदी या सर्वांची चौकशी झाली आणि सत्य ठाणेकरांसमोर आले पाहिजे, अशी मागणी मनसेचे नेते महेश कदम यांनी केली आहे.मुरुडकरसमवेत असलेल्या अधिकाऱ्यांची, सहकाऱ्यांचीदेखील चौकशी करून नावे जाहीर करा अन्यथा मनसे ती नावे सोमवारी जाहीर करेल, असा इशाराही त्यांनी महापालिका आणि सत्ताधाऱ्यांना दिला आहे.

टॅग्स :MNSमनसे