शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

Vasant More : ... तर आपल्या नगरसेवकांना, आमदारांना अमेरिकेतूनही फोन येतील; वसंत मोरेंनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 19:05 IST

गेल्या चार पाच दिवसांत आपण पाहिलं असेल, महाराष्ट्रातील असा पक्ष राहीला नाही जो माझ्याकडे आला नाही - वसंत मोरे

"मला कोरोनाचा काळ आठवला की अंगावर काटा येतो. सर्व आज पुण्याचे कार्यकर्ते उपस्थित आहेत. पुण्यात जेव्हा कोरोनाचा प्रादुर्भाव होता, तेव्हा सरकारच्या माध्यमातून जी कामं व्हायला पाहिजे होतं, ते ना सरकारनं केलं ना पालिकेनं केलं. त्यावेळी मनसेनं काम केलं. सर्व पक्षांचे नेते घरी असताना मनसेचे पदाधिकारी रस्त्यावर होते. यादरम्यान आम्ही जी भूमिका पुण्यात घेतली, यात एका अँबेसेडरची काच फुटली त्याचा आवाज महाराष्ट्रानं ऐकला. त्यानंतर एक दिवसात जे पुण्यात काम झालं. ज्या ज्या ठिकाणी ऑक्सिजनची गरज होती, तिकडेही मनसैनिक जात होता. सरकार जेव्हा मागे पडत होतं तेव्हा आम्ही दवाखाने उघडले," अशी आठवण मनसे नेते वसंत मोरे यांनी काढली. ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या राज ठाकरे यांच्या 'उत्तर सभे'दरम्यान मोरे यांनी आपलं मत व्यक्त केलं.

"कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना बँक, फायनॅन्स कंपन्यांच्या लोकांनी त्रास द्यायला सुरूवात केली. तेव्हा मनसेची दारं उघडी होती. एक गोष्ट लक्षात ठेवा फायनॅन्स वाला दारात आला की मनसेवाला आठवतो, बँकवाला दारात आला की मनसेवाला आठवतो, पैसे अडकले असतील तर मनसेवाला आठवतो. पण निवडणुका लागतात तेव्हा मनसेवाले कुठे जातात. तेव्हा का आमचा विचार होत नाही. आपण पोहोचत नाहीये, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे," असंही मोरे म्हणाले. घरचं लग्नकार्य सोडून वसंत मोरे ठाण्याला; राज ठाकरेंच्या सभेला हजर"राज ठाकरेंच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवायचा असेल तर आपल्याला काम करावं लागेल. गेल्या चार पाच दिवसांत आपण पाहिलं असेल, महाराष्ट्रातील असा पक्ष राहीला नाही जो माझ्याकडे आला नाही. आपण एक गोष्ट यातून घेतली पाहिजे, जर मनसेचा नगरसेवक इतकं चांगलं काम करतो आणि त्याला सर्व पक्षातून ऑफर येतात. तर राज ठाकरेंकडे राज्याची सत्ता हाती दिली तर अमेरिकेतून आपल्य नगरसेवकांना, आमदारांना फोन येतील, आपल्या लोकांना तिकडे बोलावून घेतील. आपण काम कसं करतो हे तुम्हाला सर्वांना माहितीये, असं त्यांनी नमूद केलं.वसंत मोरेंनीच 'राज'भेटीतलं सत्य उलगडलं, स्पष्टच सांगितलं

चंद्रकांत पाटलांकडून ऑफर"राज ठाकरेंची गेल्या तीन महिन्यांपासून तब्येत बिघडलेली आहे. त्यांना त्रास होतोय हे मी  पाहिलं. त्यांना एकेक पायरी चढण्यासाठी त्रास होत होता. ब्लू प्रिंट राज ठाकरेंनी आणली, आम्ही दोनच नगरसेवक आहोत. ती ब्लू प्रिंट कशी राबविली हे कात्रजमध्ये येऊन पहा. शंभरावर नगरसेवकांना जे जमले नाही ते आम्ही दोघांनी केले. पालिकेचा पुरस्कारही मनसेच्या नगरसेवकाला मिळाला," असं त्यांनी यावेळी सांगितलं. सोळा वर्षांमध्ये १६ गार्डन करणारा मी एकमेव नगरसेवक आहे. मला पुरस्कार देताना चंद्रकांत पाटील आणि सुप्रिया सुळे होत्या. पाटील म्हणाले, तुम्ही भाजपात या, नगरसेवक व्हाल, तेव्हा मी त्यांना उत्तर दिले, मी गेली १५ वर्षे भाजपाच्याच नगरसेवकांना पाडून नगरसेवक होतोय, असा गौप्यस्फोटही मोरे यांनी यावेळी केला. 

टॅग्स :MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेthaneठाणे