राज ठाकरेंचा इशारा, मनसे आक्रमक; विनाटोल वाहने सोडण्याचा प्रयत्न, अविनाश जाधव ताब्यात

By मुकेश चव्हाण | Published: October 9, 2023 02:16 PM2023-10-09T14:16:12+5:302023-10-09T14:20:47+5:30

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसे आणखी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

MNS Leader Avinash Jadhav arrested for attempting to leave untaxed vehicles on Mulund Tollplaza | राज ठाकरेंचा इशारा, मनसे आक्रमक; विनाटोल वाहने सोडण्याचा प्रयत्न, अविनाश जाधव ताब्यात

राज ठाकरेंचा इशारा, मनसे आक्रमक; विनाटोल वाहने सोडण्याचा प्रयत्न, अविनाश जाधव ताब्यात

googlenewsNext

टोलच्या पैशांचं काय होतं, त्याच त्याच कंपन्यांना कंत्राटं कशी मिळतात?, असा सवाल मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही टोलमुक्त महाराष्ट्राची, अशी विधानं केली. मात्र टोल हा महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा स्कॅम आहे. महाराष्ट्रातील या सगळ्यात मोठ्या स्कॅमची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी राज ठाकरेंनी केली. टोल घेत आहात, मग रस्ते चांगले का नाही?, असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. राज ठाकरे यांनी आज पुन्हा शिवतीर्थ या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत टोलच्या मुद्द्यांवरुन निशाणा साधला. 

राज ठाकरेंच्या या इशाऱ्यानंतर मनसे आणखी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वात मुलुंड टोल नाक्यावर मनसैनिक हजर झाले होते. तसेच मनसैनिकांकडून वाहनं विनाटोल सोडवण्यास सुरुवात केली आहे. नवी मुंबईत देखील मनसैनिक टोल नाक्यावर उपस्थित होते. राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुचाकी, तीन चाकी आणि किंवा चारचाकी वाहनांना टोल माफ असल्याचे सांगत आहे. त्यानूसार आम्ही लोकांना जागृत करत आहोत, की टोलमाफी आहे, असं अविनाश जाधव यांनी म्हटलं. यावेळी पोलीस अधिकारी देखील उपस्थित होते. अविनाश जाधव आणि पोलीस अधिकारी यांच्यात शाब्दिक बाचाबाची देखील झाल्याचे पाहायला मिळाले. यानंतर अविनाश जाधव यांच्यासह मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अविनाश जाधव यांना ताब्यात घेतल्यानंतर मनसैनिक आणखी आक्रमक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तत्पूर्वी, देवेंद्र फडणवीस काल म्हणाले की, राज्यात दुचाकी, तीन चाकी आणि किंवा चारचाकी वाहनांना टोल माफ आहेत. मग आजपर्यंत टोलच्या नावाखाली जमा होणारी रक्कम कुठे जमा होत आहे? एकतर राज्य सरकार खोटं बोलत आहेत किंवा टोल कंपन्या लूट करत आहेत, असा आरोप राज ठाकरेंनी केला. मी लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. आणि त्यांना सांगणार आहे की देवेंद्र फडणवीस म्हणालेत तसं दुचाकी तीन चाकी आणि चारचाकी वाहनांना टोल माफ करा, आणि इतके दिवस जे पैसे गोळा झालेत तर ते कुठे गेले? आणि इतकं होऊन पण जर टोल वसूल केला जाणार असेल तर माझे महाराष्ट्र सैनिक टोल नाक्यांवर उभे राहून वाहनांना सोडायला लावेल. आणि तरीही जर संघर्ष झाला तर आम्ही टोलनाके जाळून टाकू. मग जे होईल ते होईल, असा इशाराच राज ठाकरेंनी यावेळी दिला. 

गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही टोलमुक्त महाराष्ट्राची, अशी विधानं केली. मात्र टोल हा महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा स्कॅम आहे. महाराष्ट्रातील या सगळ्यात मोठ्या स्कॅमची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी राज ठाकरेंनी केली. टोल घेत आहात, मग रस्ते चांगले का नाही?, असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. टोलचा विषय, रस्त्यातील खड्ड्यांचा विषय हा काश्मिरइतका किचकट विषय आहे का? हा विषय इतकी वर्ष का सुटत नाही? रस्त्यातील खड्डे भरण्याची अवाढव्य रकमेची टेंडर्स कशी निघू शकतात? खड्डे भरण्याची टेंडर्स आपल्याकडेच निघतात. बाकी कुठेच घडत नाही. आणि हा विषय जर सरकारला सोडवता येत नसेल तर आम्ही आमच्या पद्धतीने सोडवू, असा इशारा देखील राज ठाकरेंनी सरकारला दिला आहे. 

Web Title: MNS Leader Avinash Jadhav arrested for attempting to leave untaxed vehicles on Mulund Tollplaza

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.