'राजकीय घडामोडी घडल्या नसत्या तर...'; अमित ठाकरेंचा आदित्यवर नाव न घेता निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2022 19:10 IST2022-07-24T19:09:52+5:302022-07-24T19:10:02+5:30

मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

MNS leader Amit Thackeray has criticized Shiv Sena leader Aditya Thackeray. | 'राजकीय घडामोडी घडल्या नसत्या तर...'; अमित ठाकरेंचा आदित्यवर नाव न घेता निशाणा

'राजकीय घडामोडी घडल्या नसत्या तर...'; अमित ठाकरेंचा आदित्यवर नाव न घेता निशाणा

ठाणे- मनसेचे नेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या मनविसे पुनर्बांधणी महासंपर्क अभियानाला सध्या जिल्ह्यात जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. मनसेच्या शाखांमध्ये जाऊन पक्षाला नवी उभारी देण्याचा प्रयत्न अमित ठाकरे करत आहेत. 

अमित ठाकरे आज ठाणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली. माझा दौरा हा नियोजित दौरा आहे. त्यांचा दौरा आता सुरू झालेला आहे. राजकीय घडामोडी घडल्या नसत्या तर त्यांचा दौरा निघाला असता का असा प्रश्न पडतो, असं अमित ठाकरे म्हणाले. 

दरम्यान, राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीत जिथं शिवसेना नेमकी कुणाची? यावरुन लढाई सुरू आहे. तर भाजपाला पुन्हा सत्तेत आल्यानं स्फुरण चढलं आहे. मंत्रिमंडळाच्या विस्ताराची वाट पाहिली जात आहे. पण अमित ठाकरे मात्र राज्यात ठिकठिकाणी स्थानिक पातळीवर लोकांच्या भेटीगाठी घेण्यात व्यग्र आहे.

मनसे राज्यातील सत्तासंघर्षापासून बरीच दूर आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे देखील शस्त्रक्रियेमुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आराम करत होते. तेही अजून फारसे काही बोलले नाहीत आणि सक्रिय देखील झालेले नाहीत. पण आपल्या पक्षाची बांधणी करण्याची धुरा अमित ठाकरेंनी घेतलेली दिसत आहे.

Web Title: MNS leader Amit Thackeray has criticized Shiv Sena leader Aditya Thackeray.