मेट्रोचे काम सुरु असतांना गर्डरवरुन पडून कामगाराचा मृत्यु; मनसे आक्रमक
By अजित मांडके | Updated: December 6, 2023 17:20 IST2023-12-06T17:19:36+5:302023-12-06T17:20:35+5:30
तीन हात नाका येथे मेट्रोचे काम सुरु असतांना वरुन गर्डरवरुन खाली पडून एका कामगाराचा मृत्यु झाल्याची घटना समोर आली आहे.

मेट्रोचे काम सुरु असतांना गर्डरवरुन पडून कामगाराचा मृत्यु; मनसे आक्रमक
अजित मांडके,ठाणे : तीन हात नाका येथे मेट्रोचे काम सुरु असतांना वरुन गर्डरवरुन खाली पडून एका कामगाराचा मृत्यु झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मनसेने घटनास्थळी धाव घेत जो पर्यंत कामगाराला न्याय मिळत नाही तो पर्यंत मेट्रोचे काम सुरु नका असा इशारा दिला आहे.
ठाण्यातील तीन हात नाका येथे वडाळा-घाटकोपर-कासारवडवली या मेट्रो ४ चे काम सुरू आहे. बुधवारी दुपारी येथील मेट्रोच्या गर्डरवरून खाली पडल्याने कामागाराचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून अपघात कसा झाला याची चौकशी केली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच मनसेने घटनास्थळी धाव घेत या घटनेची दखल घेतली आहे. कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून उपाय योजना करणे महत्वाचे असतांना त्याची खबरदारी कोणीही घेतली नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कामगाराला न्याय मिळेपर्यंत मेट्रोचे काम बंदचा इशारा मनसेने दिला आहे.
वडाळा-घाटकोपर-कासारवडली या मेट्रो चार मार्गिकेचे काम ठाण्यात सुरू आहे. या मार्गिकेच्या कामादरम्यान यापूर्वी अनेक अपघात झाल्याची नोंद आहे. काही महिन्यांपूर्वी मेट्रोचा पत्रा अंगावर पडून एका महिलेचा मृत्यू झाला होता. तीन हात नाका येथे बुधवारी दुपारी गर्डरवरून खाली पडल्याने कामगाराचा मृत्यू झाला. घटनास्थळी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात दाखल झाले असून याप्रकरणाची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे.