शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

Raj Thackeray Meets Kalpita Pimple: ... अशाप्रकारची हिंमत ठेचणं गरजेचं; कल्पिता पिंपळे यांच्या भेटीनंतर राज ठाकरे यांचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 12:48 IST

MNS chief Raj Thackeray meets thane Kalpita pimple in hospital who attacked by illegal hawker: ठाण्यात फेरीवाल्यानं केलल्या जीवघेण्या हल्ल्यात जखमी झालेल्या महापालिका सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांची राज ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन घेतली भेट.

ठळक मुद्देठाण्यात फेरीवाल्यानं केलल्या जीवघेण्या हल्ल्यात जखमी झालेल्या महापालिका सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांची राज ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन घेतली भेट.

Raj Thackeray Meets Kalpita Pimple: ठाणे महानगरपालिका क्षेत्रात फेरीवाल्यानं केलल्या जीवघेण्या हल्ल्यात जखमी झालेल्या महापालिका सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांची ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात जाऊन भेट घेतली. राज ठाकरे यांनी कल्पिता पिंपळे यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि पक्षाकडून फेरीवाल्यांबाबत योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं. त्यानंतर राज ठाकरे यांनी ठाण्याच्या पोलीस उपायुक्तांशीही चर्चा करुन संपूर्ण घटनेची माहिती घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना पोलिसही त्या फेरीवाल्यावर कठोर कारवाई करतील अशी अपेक्षा व्यक्त केली. तसंच कल्पिता पिंपळे यांना तुम्ही लवकर बऱ्या व्हा असंही सांगितल्याचं ते म्हणाले.  MNS chief Raj Thackeray meets thane Kalpita pimple in hospital who attacked by illegal hawker

"दोन गोष्टी आपण पाहणं महत्त्वाचं आहे. एक अधिकृत फेरीवाले आणि दुसरं अनधिकृत फेरीवाले. कालही मी म्हटलं त्याप्रमाणे जे काही घडलंय त्याचं दु:ख आहे. पण काळही सोकावतो. अशाप्रकारची हिंमत ठेचणं गरजेचं आहे. पोलीस त्यांची कारवाई करत आहेत. न्यायालयदेखील त्यांचं कर्तव्य बजावेल अशी पूर्ण अपेक्षा आहे. पोलिसांनी त्यांची कारवाई केली आहे त्या व्यक्तीला कठोर शिक्षा होईल," असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.  ठाणे महापालिका क्षेत्रात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करताना एका फेरीवाल्यानं ठाणे महापालिका सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. फेरीवाल्यानं कोयत्यानं केलेल्या हल्ल्यात कल्पिता पिंपळे यांची दोन बोटं तुटली आणि त्यांच्या डोक्यालाही दुखापत झाली आहे. कल्पिता पिंपळे सध्या ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल असून नुकतीच त्यांच्या बोटांवर यशस्वी शस्त्रक्रिया देखील झाली आहे. 

यापूर्वीही व्यक्त केला होता संतापराज ठाकरे यांनी याआधीच कृष्णकुंजवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याबाबत संताप व्यक्त केला होता. कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला केलेला फेरीवाला पोलिसांच्या तावडीतून सुटला की मनसैनिक त्याला चोप देतील असं रोखठोक विधान राज ठाकरे यांनी केलं होतं. त्यानंतर आज राज ठाकरे कल्पिता पिंपळे यांच्या भेटीसाठी ठाण्यात पोहोचले होते. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेthaneठाणेhospitalहॉस्पिटलThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाPoliceपोलिसCourtन्यायालय