Raj Thackeray Meets Kalpita Pimple: ... अशाप्रकारची हिंमत ठेचणं गरजेचं; कल्पिता पिंपळे यांच्या भेटीनंतर राज ठाकरे यांचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 12:47 PM2021-09-01T12:47:12+5:302021-09-01T12:48:05+5:30

MNS chief Raj Thackeray meets thane Kalpita pimple in hospital who attacked by illegal hawker: ठाण्यात फेरीवाल्यानं केलल्या जीवघेण्या हल्ल्यात जखमी झालेल्या महापालिका सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांची राज ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन घेतली भेट.

mns chief raj thackeray meets thane kalpita pimple in hospital who attacked by illegal hawker | Raj Thackeray Meets Kalpita Pimple: ... अशाप्रकारची हिंमत ठेचणं गरजेचं; कल्पिता पिंपळे यांच्या भेटीनंतर राज ठाकरे यांचं वक्तव्य

Raj Thackeray Meets Kalpita Pimple: ... अशाप्रकारची हिंमत ठेचणं गरजेचं; कल्पिता पिंपळे यांच्या भेटीनंतर राज ठाकरे यांचं वक्तव्य

Next
ठळक मुद्देठाण्यात फेरीवाल्यानं केलल्या जीवघेण्या हल्ल्यात जखमी झालेल्या महापालिका सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांची राज ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन घेतली भेट.

Raj Thackeray Meets Kalpita Pimple: ठाणे महानगरपालिका क्षेत्रात फेरीवाल्यानं केलल्या जीवघेण्या हल्ल्यात जखमी झालेल्या महापालिका सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांची ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात जाऊन भेट घेतली. राज ठाकरे यांनी कल्पिता पिंपळे यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि पक्षाकडून फेरीवाल्यांबाबत योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं. त्यानंतर राज ठाकरे यांनी ठाण्याच्या पोलीस उपायुक्तांशीही चर्चा करुन संपूर्ण घटनेची माहिती घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना पोलिसही त्या फेरीवाल्यावर कठोर कारवाई करतील अशी अपेक्षा व्यक्त केली. तसंच कल्पिता पिंपळे यांना तुम्ही लवकर बऱ्या व्हा असंही सांगितल्याचं ते म्हणाले.  MNS chief Raj Thackeray meets thane Kalpita pimple in hospital who attacked by illegal hawker

"दोन गोष्टी आपण पाहणं महत्त्वाचं आहे. एक अधिकृत फेरीवाले आणि दुसरं अनधिकृत फेरीवाले. कालही मी म्हटलं त्याप्रमाणे जे काही घडलंय त्याचं दु:ख आहे. पण काळही सोकावतो. अशाप्रकारची हिंमत ठेचणं गरजेचं आहे. पोलीस त्यांची कारवाई करत आहेत. न्यायालयदेखील त्यांचं कर्तव्य बजावेल अशी पूर्ण अपेक्षा आहे. पोलिसांनी त्यांची कारवाई केली आहे त्या व्यक्तीला कठोर शिक्षा होईल," असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

 
ठाणे महापालिका क्षेत्रात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करताना एका फेरीवाल्यानं ठाणे महापालिका सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. फेरीवाल्यानं कोयत्यानं केलेल्या हल्ल्यात कल्पिता पिंपळे यांची दोन बोटं तुटली आणि त्यांच्या डोक्यालाही दुखापत झाली आहे. कल्पिता पिंपळे सध्या ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल असून नुकतीच त्यांच्या बोटांवर यशस्वी शस्त्रक्रिया देखील झाली आहे. 

यापूर्वीही व्यक्त केला होता संताप
राज ठाकरे यांनी याआधीच कृष्णकुंजवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याबाबत संताप व्यक्त केला होता. कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला केलेला फेरीवाला पोलिसांच्या तावडीतून सुटला की मनसैनिक त्याला चोप देतील असं रोखठोक विधान राज ठाकरे यांनी केलं होतं. त्यानंतर आज राज ठाकरे कल्पिता पिंपळे यांच्या भेटीसाठी ठाण्यात पोहोचले होते. 

Web Title: mns chief raj thackeray meets thane kalpita pimple in hospital who attacked by illegal hawker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.