"संजय राऊतांनी एकांतात बडबड करण्याची सवय लावावी" राज ठाकरेंचा संजय राऊतांना सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2022 20:57 IST2022-03-12T20:56:49+5:302022-03-12T20:57:56+5:30
Raj Thackeray News : राज ठाकरे यांनी त्यांच्या पुण्यातील सभेत सेना नेते संजय राऊत यांची नक्कल केली होती, त्यावर संजय राऊत यांनी मिमिक्री करून राजकारण होत नाही असा सल्ला राज ठाकरे यांना दिला होता. यावर राज ठाकरे यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे.

"संजय राऊतांनी एकांतात बडबड करण्याची सवय लावावी" राज ठाकरेंचा संजय राऊतांना सल्ला
ठाणे - मनसे चे एकमेव आमदार राजू पाटील यांच्या दिवा येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्दघाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज ठाकरे यांनी त्यांच्या पुण्यातील सभेत सेना नेते संजय राऊत यांची नक्कल केली होती, त्यावर संजय राऊत यांनी मिमिक्री करून राजकारण होत नाही असा टोला राज ठाकरे यांना लगावला होता. यावर राज ठाकरे यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर देत, संजय राऊत यांनी एकांतात बडबड करण्याची सवय लावावी असा टोला राज ठाकरे यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.
येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या राज्यातील मनसे पदाधिकारी आणि मनसे च्या कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. याचाच भाग म्हणुन मनसे आमदार राजु पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाच राज ठाकरे यांनी उद्दघाटन केलं आहे. यावेळी मनसे नेते नितीन सरदेसाई, शिरीष सावंत,अभिजित पानसे, ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव हे उपस्थित होते.