शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

खड्ड्याच्या निषेधार्थ ठाण्यात मनसेने पुन्हा छेडले आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 3:16 PM

शहरात पडलेल्या खड्ड्यांच्या निषेधार्थ मनसेने पुन्हा आंदोलन छेडले.

ठळक मुद्देखड्ड्यांच्या निषेधार्थ मनसेने पुन्हा छेडले आंदोलन स्लो मोटर सायकल आंदोलन स्पर्धा खड्ड्यांबरोबर रस्तेही खराब - मनसे

ठाणे: शहरात ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांच्या निषेधार्थ मनसेने पुन्हा एकदा आंदोलन छेडले. मंगळवारी दुपारी खड्ड्यांत स्लो मोटर सायकल स्पर्धा आयोजित करुन महापालिकेचा मनसेने निषेध नोंदविला.      मनसे उपशहर अध्यक्ष मनोहर चव्हाण व कोपरी प्रभाग अध्यक्ष पुंडलिक घाग यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. ठाणे स्टेशन रोड येथे स्लो मोटार सायकल स्पर्धा आयोजित केली होती. यात २५ जण सहभागी झाले होते. खड्ड्यांबरोबर रस्तेही खराब असल्याचा आरोप करीत खड्डे बुजवलेच पाहिजे, महापालिकेचा निषेध अशा घोषणा यावेळी दिल्या. आंदोलनाला उपशहर अद्यक्ष महिला सेनेच्या समीक्षा मार्कंडे, महिला सेनेच्या शहर अद्यक्षा रोहिणी निंबाळकर, उपविभाग अध्यक्ष सुनील नाईक. शाखा अध्यक्ष भुपेंद्र कोळी व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. शहरात ठिकठिकाणी खड्डे पडले असून रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालविणे कठिण झाले आहे. अपघाताच्या घटनाही घडत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. शुक्रवारी शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेने खड्ड्यात झोपून अनोखे आंदोलन केले होते. वेळेत हे खड्डे बुजवले गेले नाही, तर पालिकेच्या अधिकाऱ्यांनाच या खड्ड्यांत टाकू, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला होता. दरम्यान, पोलिसांनी १४ पदाधिकाºयांना ताब्यात घेऊन सोडले होते. या खड्ड्यांच्या समस्येप्रकरणी प्रशासनाचा निषेध नोंदविण्यासाठी रविवारी देखील मनसेने शाखा अध्यक्ष हेमंत मोरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. आझादनगर येथील कोलशेत रोडवर जाणाऱ्या रस्त्यावर मनसेने खड्डा बूजवून प्रशासनाचा निषेध नोंदविला. 

टॅग्स :thaneठाणेMNSमनसेMumbaiमुंबई