शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

आमदार रवींद्र चव्हाण यांची डोंबिवलीमध्ये पारंपरिक दहीहंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 12:32 AM

प्रतीकात्मक हंडीचा जल्लोष : फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन

डोंबिवली : हिंदू संस्कृती व परंपरेची जपणूक आणि राष्ट्रभक्तीची भावना जोपासण्यासाठी भाजपतर्फे अनेक वर्षे डोंबिवलीतील बाजीप्रभू चौकात दहीहंडीचा उत्सव साजरा होतो. मात्र, यंदा कोरोनामुळे या उत्सवात खंड पडू नये, यासाठी बुधवारी फिजिकल डिस्टन्सिंग पाळून दहीहंडी साजरी करण्यात आली. यावेळी प्रतीकात्मक दहीहंडी उभारून भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली.यावेळी चव्हाण म्हणाले की, गोकुळाष्टमी म्हणजे श्रीकृष्णाचा जन्मोत्सव. वृंदावन, मथुरा, पुरी, द्वारका या पुराणकाळातील शहरांत कृष्णावताराचा उत्सव साजरा होतो. आपल्या महाराष्ट्रात विशेषत: कोकणपट्ट्यात दहीकाला-गोपाळकाला दहीहंडीच्या स्वरूपात हा सण साजरा केला जातो. गोपाळकाला शुभ्रधवल रंगाच्या दही, दूध, ताक, लोणी, पोहे यांचा. पोहे मित्रभक्तीचे, दही मातृभक्तीचे, दूध सगुणभक्तीचे, ताक विरोधभक्तीचे, लोणी निर्गुण कृष्णभक्तीचे प्रतीक असल्याचे सनातन धर्म सांगत आहे. भागवत धर्माची पताका अशाच उत्सवांतून विश्वात अनंतकाळ फडकत राहील, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला. या वेळी माजी नगरसेवक पप्पू म्हात्रे, युवा आघाडीचे मयूरेश शिर्के, पूर्व मंडळ अध्यक्ष नंदू जोशी, जिल्हा सरचिटणीस संजीव बीडवडकर, साउथ इंडियन सेलचे मोहन अय्यर आदी पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDahi Handiदहीहंडी