शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

आमदार रईस शेख यांच्याच हाती दालनाची चावी! भिवंडी महापालिकेचे महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी

By नितीन पंडित | Updated: January 23, 2026 11:22 IST

काँग्रेसच्या ३० जागा निवडून आल्याने त्यांच्याच महापौर होईल, हे जवळपास निश्चित आहे

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी असल्याने दिग्गजांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. काँग्रेसच्या ३० जागा निवडून आल्याने त्यांच्याच महापौर होईल, हे जवळपास निश्चित झाले आहे. काँग्रेससोबत राष्ट्रवादी (शरद पवार) व समाजवादी पक्ष येण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे २४ नगरसेवक हे समाजवादी पक्षाचे आ. रईस शेख यांचे समर्थक आहेत. त्यांनी निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे आ. शेख हेच महापौर ठरवतील, अशी स्थिती आहे.

राष्ट्रवादीचे (शरद पवार) १२, समाजवादीचे ६ नगरसेवक आहेत. ९० नगरसेवक असलेल्या सभागृहात बहुमतासाठी ४६ नगरसेवकांच्या पाठिंब्याची गरज आहे. तिन्ही मिळून ४८ नगरसेवक होतात. काँग्रेसचे ३० सदस्य असून त्यापैकी २४ नगरसेवक हे सपा आ. रईस शेख यांचे समर्थक आहेत. निवडणुकीत कोणताही दगाफटका नको यासाठी खबरदारी म्हणून या २४ नगरसेवकांना आ. शेख यांनी दोन दिवसांपूर्वीच अज्ञात स्थळी नेले.

तारिक मोमीन : काँग्रेसकडून प्रभाग ९ अ मधून पहिल्यांदा निवडून आले आहेत. बांधकाम व्यावसायिक आहेत. काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी समाजवादी पक्षाचे आ. रईस शेख यांच्या नगरसेवकांचा पाठिंबा घ्यावा लागणार आहे. मोमीन हे आ. शेख यांचे अत्यंत विश्वासू असल्याने त्यांच्या नावाला समाजवादी पक्षाचाही पाठिंबा असेल.

समाजवादी पक्षाचे आ. अबू आझमी व आ. शेख यांच्यात निवडणुकीदरम्यान वाद झाला होता. त्यामुळे शेख यांच्या समर्थकांनी काँग्रेसकडून उमेदवारी मिळविली. त्यातील २४ जण विजयी झाले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Bhiwandi Mayor's Key in Rais Shaikh's Hands; Open Category Seat

Web Summary : Congress likely to win Bhiwandi mayor post. Rais Shaikh's support crucial. Twenty-four Congress corporators, Shaikh's supporters, were moved before the election, solidifying his influence. Tariq Momin, a close confidant, gains support.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Bhiwandi Nizampur Municipal Corporation Electionभिवंडी-निजामपूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६