आमदार किसन कथोरे यांच्या गाडीचा अपघात, दोघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2020 21:41 IST2020-12-13T19:56:23+5:302020-12-13T21:41:27+5:30
या अपघातात आमदार किसन कथोरे यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

आमदार किसन कथोरे यांच्या गाडीचा अपघात, दोघांचा मृत्यू
अंबरनाथ: मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्या गाडीची आणि एका दुचाकीची समोरसमोर धडक बसल्यामुळे मोठा अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील तरूण व तरुणीचा जागीच मृत्यू झाला.
आमदार किसन कथोरे हे टिटवाळा येथून एक कार्यक्रम आटपून पुन्हा बदलापूरच्या दिशेने येत असताना वाहुली गावाजवळ एका भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने आमदार किसन कथोरे यांच्या गाडीची आणि दुचाकीची समोरासमोर धडक बसली. या अपघातात दुचाकीवरील अमित नंदलाल सिंग (२२) व सिमरन दिपक सिंग रा. नेतीवली यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर आमदार कथोरे यांच्या गाडीचे चालक बाजूला समोरच्या बाजूला मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच, आमदार किसन कथोरे यांच्या गाडीचे चालक आणि सुरक्षारक्षक यांना देखील किरकोळ दुखापत झाली असून त्यांना बदलापूरचा एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
टिटवाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदिप आरोटे करत आहेत.