शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
3
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
4
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
5
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
6
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
7
ना करुण नायर, ना श्रेयस अय्यर, ना साई सुदर्शन... ३ नंबर बॅटिंगसाठी गांगुलीची कुणाला पसंती?
8
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?
9
कोण आहेत १२४ वर्षीय मिंता देवी? ज्यांच्या नावाचं टी-शर्ट घालून विरोधकांचा संसदेत राडा!
10
पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; बब्बर खालसा संघटनेशी संबंधित ५ दहशतवाद्यांना अटक
11
आसिम मुनीर यांना सारखं अमेरिकेत बोलावून भारतच नव्हे, तर 'या' तीन देशांनाही इशारा देतायत डोनाल्ड ट्रम्प!
12
'परम सुंदरी'च्या रोमँटिक केमिस्ट्रीवर भाळले प्रेक्षक, सिनेमात कॉमेडीचाही तडका; ट्रेलर रिलीज
13
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
14
पोरी हुश्शार! भारतीय महिला फुटबॉल टीमने रचला इतिहास, २० वर्षांनी आशियाई कपसाठी क्वालिफाय
15
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
16
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
17
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
18
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
19
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
20
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?

Mira Road आ. गीता जैन यांच्या थप्पडचे समर्थन नाही, पण...

By संदीप प्रधान | Updated: June 26, 2023 14:29 IST

-  संदीप प्रधान (वरिष्ठ सहायक संपादक) मिरा-भाईंदरमधील भाजप समर्थक आमदार समर्थक आमदार गीता जैन यांनी एका अभियंत्याच्या कानाखाली आवाज काढला, ...

-  संदीप प्रधान(वरिष्ठ सहायक संपादक)मिरा-भाईंदरमधील भाजप समर्थक आमदार समर्थक आमदार गीता जैन यांनी एका अभियंत्याच्या कानाखाली आवाज काढला, या कृतीचे कोणीही समर्थन करणार नाही. मात्र, मुंबई महानगर प्रदेशातील वेगवेगळ्या शहरांमधील महापालिकांच्या निवडणुका दोन ते अडीच वर्षे झाले तरी झालेल्या नाहीत. माजी नगरसेवकांना नोकरशाही कस्पटासमान वागणूक देत आहे. प्रभावी आमदार असेल तरच त्यांचा शब्द अधिकारी झेलतात. परंतु, सर्वसामान्य नागरिकांना या परिस्थितीशी देणेघेणे नाही. त्यांच्या छोट्यामोठ्या नागरी समस्या, आर्थिक प्रश्न सुटावे याकरिता ते माजी नगरसेवक, आमदारांकडे खेटे घालतात. काम झाले नाही तर सोशल मीडियावर व गावभर शिव्याशाप देतात.

कोरोना काळात साथरोग कायद्यामुळे ऊतली-मातलेली नोकरशाही लोकांना उत्तरदायी नाही. विशिष्ट काळ सेवा पूर्ण केल्यावर सचिवांचा प्रधान सचिव व प्रधान सचिवांचा अतिरिक्त मुख्य सचिव होतोच, त्यामुळे लोकप्रतिनिधींमध्ये प्रचंड खदखद आहे. जैन यांनी अभियंत्याचे श्रीमुख रंगवले. निवडणुका अधिक लांबल्या तर इतरांकडूनही हाच मर्यादाभंग होऊ शकतो.

मीरा-भाईंदरमधील राजकारण क्लिष्ट आहे व तेथील भाजपमध्ये वाद आहेत. या शहरांत नरेंद्र मेहता यांचा दबदबा होता. महापालिकेत त्यांचा एकहाती कारभार चालायचा. गीता जैन यांनी मेहतांच्या साम्राज्याला आव्हान दिले व त्यांना पराभूत केले. अपक्ष निवडणूक लढवलेल्या जैन त्यांना भाजपने आपल्या छत्रछायेखाली घेतले. मात्र, भाजपमधील अनेक बड़े नेते आजही मेहतांची पाठराखण करतात. महापालिकेतील अधिकारी मेहतांचे आदेश शिरसावंद्य मानतात. दुसरे प्रभावी नेते शिवसेनेचे (शिंदे गटाचे प्रताप सरनाईक आहेत. मेहता व सरनाईक यांच्या तुलनेत जैन या  राजकारणात तुलनेने कच्चा लिंबू असल्याची नोकरशहांची भावना आहे. त्यामुळे अधिकारी, पोलिस या साऱ्यांमध्ये आपले महत्त्व निर्माण करण्याकरिता जैन यांना संघर्ष करावा लागत आहे. ती खदखद त्यांच्या मनात आहे. त्याचाच स्फोट झाला.

 माजी नगरसेवक कर्जबाजारीअनेक दातृत्ववान माजी नगरसेवक कर्जबाजारी झाले असल्याची चर्चा आहे.

- मीरा-भाईंदर महापालिकेत म केलेत. त्यांना २५ हजार वेतन मंजूर केलेय. प्रत्यक्षात ज्या एजन्सीकडून ते नियुक्त होतात ती त्यांना १७ हजार रुपये देते. त्यामुळे ज्याची जेवढी उपद्रव क्षमता, तेवढी त्याची कमाई, असा कारभार सुरु आहे.- अनेक महापालिकेत सरकारने प्रतिनियुक्तीवर अधिकारी पाठवलेत. हे अधिकारी अमुक तमुक मंत्र्यांच्या विश्वासातील असल्याने ते कुणालाच भीत नाहीत. त्यांचे गॉडफादर मंत्रालयात आहेत.- तळागाळातील लोकशाही व लोकप्रतिनिधीची व्यवस्था उद्ध्वस्त होणे लोकसभा व विधानसभा निवडणुकीतही राजकीय पक्षांना घातक ठरणार आहे.माजी नगरसेवकांची अवस्था तर आई जेऊ घालिना, बाप भीक मागू देईना, अशी झाली आहे. पालिकेच्या समितीवर सदस्य असताना अर्थचक्र सुरू असते. आता अधिकाऱ्यांनीच सात टक्के खिशात घालायला सुरुवात केल्याचे उघडपणे बोलले जाते.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकmira roadमीरा रोड