शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

बंदोबस्तासाठी असलेल्या महिला व पुरुष पोलीसांना आवश्यक साहित्यांचे किट मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 16:21 IST

ठाणे लोकसभा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी तैनात ठाणे ग्रामीण पोलीस हद्दीतील पोलीस कर्मचारायांना मतदानाच्या आदल्या दिवसापासुन बंदोबस्त लागणार आहे.

मीरारोड - ठाणे लोकसभा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी तैनात ठाणे ग्रामीण पोलीस हद्दीतील पोलीस कर्मचारायांना मतदानाच्या आदल्या दिवसापासुन बंदोबस्त लागणार आहे. अशा पोलीस कर्मचारायांसाठी साबण, पेस्ट , बिस्कीट आदी आवश्यक साहित्याचे किट दिले जाणार आहे. बंदोबस्ता वरील पोलीसांची गैरसोय होऊ नये म्हणून पहिल्यांदाच जिल्ह्यात असे साहित्य दिले जात आहे. महिला व पुरुष पोलीसांसाठी वेगवेगळं किट तयार करण्यात आली आहेत.मतदानाच्या आदल्या दिवसापासून मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवला जातो. रात्रभर मतदान केंद्रावर बंदोबस्त केल्या नंतर मतदाना दिवशी सुध्दा त्याच पोलीसांना उभे रहावे लागते. अगदी रात्री इव्हीएम यंत्र पेट्यां मध्ये सीलबंद करुन कडेकोट जागी ठेवे पर्यंत पोलीसांना जाता येत नाही. जवळपास चाळीस तास सलग ड्युटी करावी लागते. मतदानाच्या दिवशी लवकर उठुन आंघोळ आदी करण्यासाठी सुध्दा मतदान केंद्रातच थांबावे लागते. बंदोबस्तसाठी केलेल्या नेमणुकीच्या जागे वरुन हलता येत नाही.यंदा मात्र ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजीर राठोड यांनी पोलीस कर्मचारायांची गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक साहित्याचे किट बंदोबस्ता वरील पोलीसांना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने पोलीसांनी सुमारे ३ हजार किट तयार केले आहेत. यात पुरुष आणि महिला पोलीसांसाठी वेगवेगळे किट आहेत. पुरुषांच्या किट मध्ये ९ तर महिलांच्या किट मध्ये त्याांना आवश्यक असलेल्या १२ वस्तुंचा समावेश आहे. आंघोळीचा साबण, पेस्ट, ब्रश, डोक्याचे तेल, बिस्कीट पुडा, गरमीच्या अनुषंगाने ग्लुकोज पावडर आदी वस्तुंचा किट मध्ये समावेश आहे.ठाणे ग्रामीण पोलीसांचे सुमारे अडिज हजार पोलीस कर्मचारायांसह अन्य जिल्ह्यातुन येणारे पोलीस, राज्य राखीव दल, दंगल नियंत्रण पथक आदी पाचशे पोलीसांसाठी किट तयार करण्यात आले आहे. किट वर डॉ. राठोड यांच्या कडुन निवडणुक बंदोबस्ता साठी असलेल्या पोलीस कर्मचारायांना शुभेच्छा अशा प्रकारचे स्टीकर लावण्यात आले आहे. ठाणे ग्रामीण पोलीसां कडुन पहिल्यांदाच असा उपक्रम राबवण्यात आला असुन याचा खर्च पोलीस कल्याण निधी मधुन केला जाणार आहे. या आधी सांगल जिल्ह्यात अशा प्रकारे किट देण्यात आली होती.पोलिसांकडे आवश्यक त्या सर्व वस्तू किट मुळे त्यांच्या जवळ राहणार आहेत. त्यामुळे बंदोबस्त सोडून अन्यत्र जाणे किंवा अन्य कोणा कडुन वस्तु मागण्याची गरज पडणार नाही. शिवाय गरजेच्या वस्तु एकाच किट मधुन खात्याकडून दिल्याने सुखद अनुभव मिळणार आहे असे सूत्रांनी सांगितले.

 

टॅग्स :PoliceपोलिसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019thaneठाणे