अपक्ष आमदाराला कोरोनाची लागण; नगरसेवक अन् पालिका अधिकाऱ्यांना केलं क्वारंटाईन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2020 07:00 IST2020-07-02T02:17:13+5:302020-07-02T07:00:52+5:30
जैन पालिकेच्या जोशी रुग्णालयात आयसीयू, व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यापासून सक्रिय होत्या. न्यू गोल्डन नेस्टजवळ अलगीकरणासाठी इमारत त्यांनीच उपलब्ध करून दिली होती

अपक्ष आमदाराला कोरोनाची लागण; नगरसेवक अन् पालिका अधिकाऱ्यांना केलं क्वारंटाईन
मीरा रोड : मीरा- भाईंदरमधील अपक्ष आमदार गीता जैन यांच्यासह अग्निशमन दलाचे अधिकारी, नगरसेवक, पोलीस, पालिका तसेच वैद्यकीय विभागातील कर्मचाऱ्यांना कोरोना झाला आहे.
जैन पालिकेच्या जोशी रुग्णालयात आयसीयू, व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यापासून सक्रिय होत्या. न्यू गोल्डन नेस्टजवळ अलगीकरणासाठी इमारत त्यांनीच उपलब्ध करून दिली होती. शिवाय त्यांचे मदतकार्य सुरूच होते. वास व चव येत नसल्याने त्यांनी कोरोनाची चाचणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांना सध्या होम क्वारंटाइन केले आहे. मीरा रोडच्या एका भाजप नगरसेवकास कोरोनाची लागण झाली असून उपचारासाठी ते खासगी रुग्णालयात दाखल झाले आहेत.
पालिकेच्या अग्निशमन दलातील अधिकाºयास कोरोनाची लागण झाल्याने ते भक्तीवेदांत रुग्णालयात दाखल आहेत. नगररचना विभागातील कर्मचाºयास कोरोनाची लागण झाली असल्याने अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करणे सुरू आहे. मीरा भार्इंदरमधील आणखी ५ पोलीस कर्मचाºयांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.