मीरा-भाईंदरचा पाणीपुरवठा एक बंद राहणार; महापालिका पाणीपुरवठा विभागाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 15:20 IST2022-03-30T15:17:19+5:302022-03-30T15:20:01+5:30
मीरा रोड : मीरा-भाईंदर शहरास स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा दुरुस्ती कामामुळे गुरुवार सकाळ ते शुक्रवार सकाळपर्यंत बंद राहणार आहे. ...

मीरा-भाईंदरचा पाणीपुरवठा एक बंद राहणार; महापालिका पाणीपुरवठा विभागाची माहिती
मीरा रोड : मीरा-भाईंदर शहरास स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा दुरुस्ती कामामुळे गुरुवार सकाळ ते शुक्रवार सकाळपर्यंत बंद राहणार आहे.
शहराला स्टेम व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा करण्यात येतो. स्टेमकडून रोज ८६ दशलक्ष लीटर पाणी शहरास दिले जाते. माणकोली एमबीआर येथे स्टेम प्राधिकरणाच्या जलवाहिनीवर गळती होत असल्याने ही गळती दुरुस्ती करण्यासाठी स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा बुधवार, ३० मार्चला सकाळी ९ ते गुरुवार ३१ मार्चला सकाळी ९ वाजेपर्यंत २४ तासांसाठी बंद राहणार आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा सुरू राहणार आहे. तरी स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा पूर्ववत होईपर्यंत शहरास पाणीपुरवठा कमी दाबाने व उशिराने होईल. नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा व महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे यांनी केले आहे.