शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal : अजित पवार गटात नाराज,शरद पवारांसोबत पुन्हा परत जाणार का? छगन भुजबळांनी थेटच सांगितलं
2
Pakistan out of T20 World Cup : पाऊस आला धावून, पाकिस्तान गेला वाहून! अमेरिका Super 8 मध्ये, रचला इतिहास
3
'शरद पवार माझे आवडते नेते, माझं काम त्यांनी तीन मिनीटांत केलं होतं'; अशोक सराफ यांनी सांगितला किस्सा
4
अमित शहांनी सुरक्षा अधिकाऱ्यांची घेतली बैठक; जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचा घेतला आढावा
5
Maharashtra Assembly Session : राज्याचं पावसाळी अधिवेशन ठरलं! अर्थसंकल्प 'या' दिवशी मांडणार, किती दिवस चालणार?
6
मोठी बातमी! अमोल किर्तीकर यांना सीसीटीव्ही फूटेज देण्यास उपनगर जिल्हाधिकाऱ्यांचा नकार
7
इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे केले स्वागत, पाहा व्हिडीओ
8
अजय जडेजानं वन डे वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानला मार्गदर्शन करण्यासाठी एकही रुपया घेतला नाही
9
“छगन भुजबळांनी बंड पुकारून आपले बळ दाखवावे, विधानसभेत धडा शिकवावा”: विजय वडेट्टीवार
10
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: वाह ‘गुरु’! मातीचे सोने करण्याची शक्ती असलेला ग्रह; चंद्राशी ‘युती’ म्हणजे ‘राजयोग’च
11
Maharashtra Politics : 'अजितदादांना सगळीकडून घेरलं,पण पक्षातील कोणच बोलत नाही'; जितेंद्र आव्हाडांनी स्पष्टच सांगितलं
12
“आमचे सरकार आले तर मराठा आरक्षणाची मागणी प्रथम पूर्ण करणार”; जयंत पाटील यांनी दिली गॅरंटी!
13
रशिया-युक्रेन युद्ध थांबणार; राष्ट्राध्यक्ष पुतिन म्हणाले- 'युद्धविरामाला आम्ही तयार, पण...'
14
अजित पवारांच्या विरोधातील मोहीम कुणाच्या इशाऱ्यावर? अण्णा हजारेंच्या भूमिकेवर NCPचा पलटवार
15
“शाहगड येथे कार्यालय सुरू करणार, आंदोलन सोडणार नाही”; मनोज जरांगेंचा पुन्हा एल्गार
16
ICC ने जाहीर केलं टीम इंडियाचं Super 8 चं वेळापत्रक; जाणून घ्या कधी, केव्हा व कोणाला भिडणार
17
सुनेत्रा पवार यांचा फॉर्म भरताना शिंदे-फडणवीस का नव्हते? अजित दादांनी स्पष्टच सांगितले
18
Photos: तुम हुस्न परी... डिझायनर ड्रेस, फॅशनेबल गॉगल; अवनीत कौरचं 'ग्लॅमरस' फोटोशूट
19
या पेनी स्टॉकच्या खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड, किंमत ₹5 पेक्षाही कमी, एकाच महिन्यात दिला 55% परतावा!
20
RSSच्या मुखपत्रातून राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका; अजित पवारांचे थेट शब्दांत भाष्य, म्हणाले...

मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय, डायल ११२ तत्परतेत राज्यात सर्वप्रथम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 3:04 PM

Mira Bhayander News: नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी, कुठलीही घटना घडल्यास पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचावेत, यासाठी मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाची डायल ११२ ही यंत्रणा जानेवारी महिन्यात राज्यात अव्वल आली आहे.

- मंगेश कराळे नालासोपारा - नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी, कुठलीही घटना घडल्यास पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचावेत, यासाठी मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाची डायल ११२ ही यंत्रणा जानेवारी महिन्यात राज्यात अव्वल आली आहे. जानेवारी २०२४ मध्ये पोलीस आयुक्तालय हे नागरिकांना पोलीस मदत पोहचिवण्यात संपुर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आले आहे. नियंत्रण कक्षात ६ अधिकारी, २४ कर्मचारी २४ तास ऑन ड्यूटी पोलीस आयुक्तालयाच्या कार्यालयात असलेल्या नियंत्रण कक्षात कार्यरत असतात.

सर्वसामान्य नागरीकांनी पोलीस मदतीकरीता डायल ११२ वर केलेल्या कॉलला नव्या व आधुनिक सुविधेमुळे अतिशय कमी वेळात पोलीस मदत मिळण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. त्यानुसार जानेवारी २०२४ मध्ये पोलीस आयुक्तालयातील १७ पोलीस ठाण्यापैकी नालासोपारा पोलीस ठाणे नागरीकांना मदत पोहचविण्यात प्रथम क्रमांकावर आलेले असून त्यांचा वेळ १ मिनिटे ३४ सेकंद असा आला आहे. तर आयुक्तालयाचा सरासरी वेळ २ मिनिटे ३७ सेकंद आहे. तसेच यापुढेही पोलीस आयुक्तालयातील नागरीकांना तात्काळ पोलीस मदत पोहचिवण्यासाठी प्रयत्नशील राहील असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

आयुक्तालयातील पोलीस नियंत्रण कक्षास, नागरीकांकडून दररोज सरासरी २०० ते २२० तर महिनाभरात एकूण ६३०५ तक्रारींचे कॉल प्राप्त झाले आहेत. त्याकरीता पोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांनी कमीत कमी वेळात नागरीकांना पोलीसांचा दर्जेदार प्रतिसाद मिळेल यादृष्टीने मार्गदर्शन केले. सर्व बिट मार्शल व पीसीआर वाहनांवरील स्टाफ यांना समुपदेशन करून नागरीकांच्या प्रति संवेदनशिलता वाढविणेकरीता आवश्यक ते प्रशिक्षण दिले गेले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नियंत्रण कक्षामार्फत रोजच्या रोज याबाबत आढावा घेऊन प्रतिसाद वेळ जास्त देणाऱ्या संबंधित पोलीस अधिकारी व अंमलदारांना आवश्यक ते व्यक्तीगत मार्गदर्शन केले जाते.

पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षात डायल ११२ यंत्रणेला काही वाहने व प्रशिक्षित अधिकारी, कर्मचारीही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. इमर्जन्सी रिस्पॉन्स सपोर्ट सिस्टिम अंतर्गत तत्काळ पोलिस मदत देण्यासाठी सुरू करण्यात आलेली डायल ११२ योजना आयुक्तालयातील लोकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरPoliceपोलिस