तबलिगी जमातच्या कार्यक्रमात मीरा भाईंदरमधील १५ जणांचा सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2020 11:32 PM2020-04-01T23:32:38+5:302020-04-01T23:33:16+5:30

दिल्लीतील सदर धार्मिक कार्यक्रमातुन मोठ्या संख्येने कोरोनाची लागण झालेले देशभरात पसरल्याने खळबळ उडाली आहे.

From Mira Bhayandar, 15 people went to the Tbiligi A Jamaat program | तबलिगी जमातच्या कार्यक्रमात मीरा भाईंदरमधील १५ जणांचा सहभाग

तबलिगी जमातच्या कार्यक्रमात मीरा भाईंदरमधील १५ जणांचा सहभाग

Next

मीरारोड - दिल्लीच्या निजामुदद्दीन भागात झालेल्या तबलिगी जमात या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मीरा भाईंदर मधुन १५ जणं गेले होते . परंतु यातील केवळ दोघेच जण शहरात असुन १३ जणं दिल्ली वरुनच परस्पर आपल्या मुळगावी निघुन गेल्याचा तर काही जणं अनेक महिन्यां पासुन येथे रहात नसल्याचे समोर आले आहे. शहरात असलेल्या दोघांनाही घरीच अलगीकरणात ठेवले असुन पालिका व पोलीस त्यांच्यावर लक्ष ठेऊन आहेत.

मार्च मध्ये झालेल्या दिल्लीतील सदर धार्मिक कार्यक्रमातुन मोठ्या संख्येने कोरोनाची लागण झालेले देशभरात पसरल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे सदर कार्यक्रमात देशाच्या कोणकोणत्या भागातुन लोकं सहभागी झाले होते याची माहिती आता त्या त्या भागातील पोलीस व पालिका प्रशासनास दिली जात आहे. त्याअनुषंगाने मीरा भाईंदर मधुन १५ जणं गेल्याची माहिती आली. नयानगर पोलीस ठाणे हद्दीत ५, नवघर पोलीस ठाणे हद्दीत ४, काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीत ३, भाईंदर पोलीस ठाणे हद्दीत २ तर मीरारोड पोलीस ठाणे हद्दीत १ जणाचे वास्तव्य होते.

पोलीस आणि पालिकेने या १५ जणांची पडताळणी केली असता १५ पैकी नयानगर व नवघर पोलीस ठाणे हद्दीत प्रत्येकी एक जणच राहत्या पत्यावर आढळुन आले आहेत. बाकीचे राहत्या पत्यावर आढळुन आले नसुन काही जणं अनेक महिन्यां पासुन रहात नव्हते तर काही जण दिल्ली वरुनच आपापल्या गावी निघुन गेल्याचा संशय आहे. नवघर पोलीस ठाणे हद्दीत रहात असलेला इसम हा १३ मार्च ला गेला होता व २१ मार्च रोजी शहरात परतला. तो व नया नगरचा मिळुन दोघाही जणांना त्यांच्या राहत्या घरातच देखरेखी खाली ठेवण्यात आलेले आहे. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळुन आलेले नाही असे सुत्रांनी स्पष्ट केले.

Web Title: From Mira Bhayandar, 15 people went to the Tbiligi A Jamaat program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.