अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करणा-यास अटक  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2017 21:47 IST2017-10-24T21:47:04+5:302017-10-24T21:47:17+5:30

Minor girl arrested for sexual harassment | अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करणा-यास अटक  

अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करणा-यास अटक  

ठाणे - अनुसूचित जातीतील एका १७ वर्षीय मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी राकेश कदम (३०) याला राबोडी पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. त्याला १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
राबोडी परिसरात राहणारी ही मुलगी २२ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास तिच्या इमारतीमधील तळमजल्यावरून जात असताना त्याच परिसरात राहणा-या राकेशने ती एकटी असल्याचा गैरफायदा घेत तिला अडविले. ‘तुझा १ आॅक्टोबर रोजी बर्थ डे होता, तरी तू मला बर्थ डेची कॅडबरी का दिली नाही,’ असे म्हणून तिचा हात पकडून तिला त्याच्या घरात त्याने जबरदस्तीने खेचले. नंतर दरवाजा बंद करून तिचा विनयभंग केला. या प्रकाराने प्रचंड भेदरल्याने मुलीने आरडाओरडा केल्यानंतर त्याने तिला घरात कोंडले. नंतर बाहेरुन दरवाजा लावून पळ काढला. तिच्या तक्रारीनंतर राबोडी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध विनयभंग, बालकांचे लैंगिक शोषण, अनुसुचित जाती जमाती कायदा आदी कलमांखाली २३ आॅक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा दाखल होताच वरीष्ठ पोलीस निरीक्षक रामराव सोमवंशी यांच्या पथकाने त्याला अटक केली. याप्रकरणी नौपाडा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त अभय सायगावकर अधिक तपास करीत आहेत. 

 

Web Title: Minor girl arrested for sexual harassment

टॅग्स :Crimeगुन्हा