लोकमतच्या वृत्ताची दखल; राज्यमंत्र्यांनी केली डोंबिवलीच्या पूलांची पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2017 05:46 PM2017-09-30T17:46:13+5:302017-09-30T18:43:22+5:30

राज्यमंत्री रवींद्र चव्हाण करणार डोंबिवलीतील पूर्व पश्चिम जोडलेल्या गणेश मंदिर, ठाकुर्ली या पादचारी पुलाचे तसेच मुबंई दिशेकडील उड्डाणपुलाची पाहणी केली.

Minister of State for Dombivli Ravindra Chavan made a survey of the Railway bridges | लोकमतच्या वृत्ताची दखल; राज्यमंत्र्यांनी केली डोंबिवलीच्या पूलांची पाहणी

लोकमतच्या वृत्ताची दखल; राज्यमंत्र्यांनी केली डोंबिवलीच्या पूलांची पाहणी

Next
ठळक मुद्दे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण करणार डोंबिवलीतील पूर्व पश्चिम जोडलेल्या गणेश मंदिर, ठाकुर्ली या पादचारी पुलाचे तसेच मुबंई दिशेकडील उड्डाणपुलाची पाहणी केली. यावेळी जिथे आवश्यकता तिथे निधी उभा करणार असल्याचं रविंद्र चव्हाण यांनी सांगितलं आहे.

डोंबिवली: मध्य रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीचे स्थानक म्हणून ख्याती असलेल्या डोंबिवली रेल्वे स्थानकातही कल्याण मार्गावरील पादचारी पूलावर संध्याकाळच्या वेळेत चेंगराचेंगरी होते. त्याला तेथिल फेरिवाले आणि भटके कुत्रे यासह अन्य गैरसोयी जबाबदार असून त्या बाबी तेथे असू नयेत अशी आग्रही भूमिका घेत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी रेल्वे अधिका-यांना फैलावर घेतले. केवळ बदलीसाठी कींवा अन्य कारणांसाठी फे-या वरिष्ठांसह ठिकठिकाणी फे-या मारता ते न करता स्थानकाकडेही लक्ष द्यावे असे खडसावले.

पादचारी पुलांसह प्रवाशांना अडचणी होणा-या ठिकाणी कोणतीही गैरसोय असू नयेत याची कायमस्वरुपि दक्षता घ्यावी असे सांगत त्यांनी डोंबिवलीकरांना त्रास झाला तर खपवून घेतले जाणार नाही असे स्पष्ट सांगितले. असे सांगत त्यांनी स्थानकातील अस्वच्छतागृहे असे म्हणत स्थानक प्रबंधक आणि सुरक्षा अधिका-यांना फैलावर घेतले. जर स्थानकात कोणाच्या दुर्लक्षामुळे दूर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण? वातानुकूलीत दालनात आठ तास घालवण्यापेक्षा स्थानकातील अस्वच्छता, गैरसोयींकडे लक्ष द्यावे असे स्पष्ट केले. स्थानकातील कल्याण-मुंबई दिशेकडील पादचारी पुलांवर गर्दीच्या वेळेत अडथळयांमुळे अपघात होऊ शकतो याची शक्यता लक्षात घेत चव्हाण यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी पाहणी दौरा केला.

त्यात गणेशमंदिर नजीकच्या पादचारी पूलाची प्रारंभी त्यांनी पाहणी केली. त्याची डागडुजी तातडीने रविवारपासून सुरु करण्याचे आदेश त्यांनी दिले. त्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाइल असेही त्यांनी स्पष्ट केले. केडीएमसीचे अभियंता प्रशांत भुजबळ यांना डागडुजी करण्यासंदर्भात कोणकोणती कामे करावी लागतील याची माहिती घेत तातडीने कामाला सुरुवात करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर राज्यमंत्र्यांनी डोंबिवली स्थानकाच्या कल्याण दिशेकडील पादचारी पुलाची पाहणी केली. त्यावेळी प्रज्ञेश प्रभुघाटे, शशिकांत कांबळे, संजीव बीडवाडकर,नगरसेविका खुशबु चौधरी, प्रमिला चौधरी, रवी ठक्कर, हरिश गावकर यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

 लोकमतच्या हॅलो ठाणेमधील रेल्वे स्थानके? नव्हे बाजार या वृत्ताचीही त्यांनी माहिती घेतली. त्यासंदर्भात काय उपाययोजना केली असा सवाल त्यांनी सहाय्यक स्थानक प्रबंधक संजय यादव यांना आणि लोहमार्ग पोलीस निरिक्षक गौरीप्रसाद हिरेमठ यांना केला. स्थानक प्रबंधकांनी यासंदर्भात फेरिवाल्यांवर कारवाइ केली जातेच पण केडिएमसी हद्दीच्या फेरिवाल्यांचा त्रास होत असल्याचे सांगितले. त्यानूसार त्यांनी तातडीने आयुक्त वेलारसू यांना पत्र खरमरीत पत्र लिहा, ते मलाही द्यावे असे सांगत मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिका-यांशी चर्चा केली. तसेच पत्रात जर महापालिकेच्या असुविधांचा त्रास होऊन रेल्वे हद्दीत अपघात घडला तर त्याला आयुक्त जबाबदार असतील असे स्पष्ट नमूद करावे असे म्हंटले.
 

Web Title: Minister of State for Dombivli Ravindra Chavan made a survey of the Railway bridges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.