ठाणे-भिवंडी मार्गिकेवर डिसेंबरपर्यंत मेट्रोची धाव?; मेट्रो ५ कारशेडविना मेट्रो चालवण्याच्या हालचाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 08:34 IST2026-02-09T08:32:39+5:302026-02-09T08:34:07+5:30

डिसेंबरपर्यंत कारशेडचे काम पूर्ण होण्याची शक्यता नसल्याने सुरुवातीला गाड्यांच्या देखभाल, दुरुस्तीसाठी स्टॅबलिंग मार्गिका उभारण्यात येणार आहेत

Metro to run on Thane-Bhiwandi route till December?; Metro 5 to run without car shed | ठाणे-भिवंडी मार्गिकेवर डिसेंबरपर्यंत मेट्रोची धाव?; मेट्रो ५ कारशेडविना मेट्रो चालवण्याच्या हालचाली

ठाणे-भिवंडी मार्गिकेवर डिसेंबरपर्यंत मेट्रोची धाव?; मेट्रो ५ कारशेडविना मेट्रो चालवण्याच्या हालचाली

अमर शैला

मुंबई : ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो ५ मार्गिका डिसेंबरपर्यंत सुरू करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) हालचाली सुरू केल्या आहेत.  त्यामुळे भिवंडीला पहिली मेट्रो या वर्षाअखेर मिळण्याची शक्यता आहे, असे ‘एमएमआरडीए’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मेट्रो ५ मार्गिका २४.४५ किमी लांबीची असून, त्यावर १७ स्थानके आहेत. यासाठी सुमारे ८ हजार ४१६ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. ती दोन टप्प्यांत सुरू करण्याचे नियोजन एमएमआरडीएने केले आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात कापूरबावडी ते धामणकर नाका असा १२.२० किमी लांबीचा मार्ग सुरू करण्यात येत आहे. यामध्ये सात स्थानकांचा समावेश आहे. सध्या पहिल्या टप्प्यातील मार्गिकेचे  ९७ टक्के स्थापत्य काम पूर्ण झाले आहे. केवळ कापूरबावडी येथील एका खांबाचे काम रखडले होते. एका नेत्याच्या विरोधामुळे जाहिरात बोर्ड हटवू न शकल्याने हे काम थांबले होते. तसेच मेट्रो मार्गिकेसाठी एक इमारत अडथळा ठरत होती. आता हा बोर्ड काढून टाकण्यात आला असून, अडथळे दूर झाले आहेत.

मेट्रो ५ वर दृष्टीक्षेप 
पहिल्या टप्प्यातील मार्ग 
कापूरबावडी ते धामणकर नाका
लांबी -  १२.२० किमी
स्थानके - ७

सप्टेंबरपर्यंत चाचण्या
उर्वरित स्थापत्य कामेही लवकरच पूर्ण होतील. त्यानंतर या मेट्रो मार्गिकेवर यंत्रणा उभारण्याच्या कामांना गती दिली जाणार असून, सप्टेंबरपर्यंत चाचण्यांना सुरुवात करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न आहे. डिसेंबरपर्यंत कारशेडचे काम पूर्ण होण्याची शक्यता नसल्याने सुरुवातीला गाड्यांच्या देखभाल, दुरुस्तीसाठी स्टॅबलिंग मार्गिका उभारण्यात येणार आहेत. त्याद्वारे मेट्रो चालवण्याचा एमएमआरडीएचा विचार आहे.

खरेदीसाठी कंत्राट 
मेट्रोची कारशेड कशेळी येथे उभारण्यात येणार आहे. ही जागा दलदलीची आहे. त्यामुळे त्यावर बांधकाम करण्यापूर्वी भराव टाकून ती बांधकामायोग्य करण्यात येणार आहे. त्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर कारशेडच्या कामाला सुरुवात होईल. ती तयार होण्यासाठी दोन वर्षे लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, मेट्रो ५ मार्गिकेसाठी २२ मेट्रो गाड्या खरेदीकरिता टिटागढ रेल सिस्टीम्स कंपनीला ऑक्टोबरमध्ये २४८१ कोटींचे कंत्राट देण्यात आले. कंत्राटदाराला रोलिंग स्टॉक, सिग्नलिंग व टेलिकॉम यंत्रणा, प्लॅटफॉर्म स्क्रीन दरवाजे, डेपो प्लांट मशिनरी आदी पुरवण्याचे काम करावे लागणार आहे.

Web Title : ठाणे-भिवंडी मेट्रो दिसंबर तक संभव; बिना कार शेड संचालन?

Web Summary : ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो 5 का लक्ष्य दिसंबर तक शुरू होना है। प्रारंभिक संचालन बिना कार शेड के हो सकता है, रखरखाव के लिए स्टेबलिंग लाइनों का उपयोग किया जाएगा। पहला चरण, कपूरबावडी से धामणकर नाका, 97% पूरा, सितंबर तक परीक्षण अपेक्षित।

Web Title : Thane-Bhiwandi Metro Likely by December; Operations Without Car Shed?

Web Summary : Thane-Bhiwandi-Kalyan Metro 5 aims to launch by December. Initial operations may occur without a completed car shed, using stabling lines for maintenance. The first phase, Kapurbawdi to Dhamankar Naka, is 97% complete, with trials expected by September.

टॅग्स :Metroमेट्रो