मनोरुग्ण आईने दोन लेकरांसह घेतले विष, मुलगा बचावला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 15:50 IST2025-10-14T15:50:39+5:302025-10-14T15:50:52+5:30
मुलाला आला होता संशय, श्रीनगर पाेलिसांत गुन्हा

मनोरुग्ण आईने दोन लेकरांसह घेतले विष, मुलगा बचावला
ठाणे : प्रसाद, अंगाऱ्यातून वैफल्यग्रस्त रेखा जैन (३९) हिने मुलगी खुशी (१९), मुलगा दक्ष (१८) यांना विषारी द्रव्य पाजून स्वत:ही विषप्राशन करून आत्महत्या केली. या घटनेत मायलेकीचा मृत्यू झाला. मात्र, संशय आल्याने मुलाने प्रसाद फेकला. त्यामुळे तो बचावला. या प्रकरणी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती श्रीनगर पाेलिसांनी साेमवारी दिली.
वागळे इस्टेट भागात राजेंद्र जैन (३९) याचे भंगार विक्रीचे दुकान आहे. त्याची पत्नी २०२३ पासून मानसिक आजाराने त्रस्त हाेती. यातूनच हाेत असलेल्या काैटुंबिक कलहातून ती वैफल्यग्रस्त झाली हाेती.
गावाहून परतली अन्...
८ ऑक्टाेबर राेजी सासरी व माहेरच्या गावांवरून परतली हाेती. त्याचदिवशी सकाळी ११ च्या सुमारास तिने आधी मुलीला, नंतर मुलाला जबरदस्तीने भगवान का प्रसाद असल्याचे सांगत अंगारा पाण्यात मिसळून पिण्यास दिला.
कडवट चव लागल्याने दक्षने प्रसाद गिळला नाही. काही वेळानंतर मुलाने वडिलांना बाेलावले. आई बेडरूमध्ये असल्याचे सांगितले. त्याने खिडकीच्या झडपेतून पाहिले असता खुशीला उलटी झाली होती, तर बाथरूममध्ये रेखा अंघोळ करीत हाेती.
रेखाला जाब विचारला असता तिने घडलेला प्रसंग पतीला सांगितला. त्या दाेघींना परिसरातील रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान दाेघींचा मृत्यू झाला.