TMC: महापौरपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित; सत्ताधाऱ्यांच्या हालचालींना वेग, 'या' नावांची चर्चा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 18:12 IST2026-01-22T18:10:00+5:302026-01-22T18:12:43+5:30

TMC Mayor: ठाणे महापालिकेच्या महापौर पदासाठी गुरुवारी आरक्षण सोडत जाहीर झाली असून यंदा हे पद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे.

Mayor's post reserved for Scheduled Castes; Movements accelerate in ruling circle, 'these' names are hotly debated! | TMC: महापौरपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित; सत्ताधाऱ्यांच्या हालचालींना वेग, 'या' नावांची चर्चा!

TMC: महापौरपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित; सत्ताधाऱ्यांच्या हालचालींना वेग, 'या' नावांची चर्चा!

ठाणे महापालिकेच्या महापौर पदासाठी गुरुवारी आरक्षण सोडत जाहीर झाली असून यंदा हे पद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे सत्ताधारी युतीत महापौरपदावर कोणाची निवड होणार, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः शिंदे सेनेतील काही नावं आता पुढे आली आहेत. तर भाजपने केलेल्या दाव्यांतर त्यांना संधी मिळाल्यास त्यांच्याकडील दोन नावे पुढे आली आहेत.
 
ठाणे महापालिका निवडणुकीपूर्वी प्रभागनिहाय आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली होती. १३१ जागांसाठी झालेल्या या आरक्षणात अनुसूचित जातीसाठी ९, अनुसूचित जमातीसाठी ३, नागरिकांचा मागासवर्ग (ओबीसी) साठी ३५ तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी ८४ जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर आता महापौर पदही अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने या प्रवर्गातून निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी एकाच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडणार हे स्पष्ट झाले आहे.

ठाणे महापालिका निवडणूक शिंदे सेना आणि भाजप यांनी युतीत लढवली होती. निवडणुकीत शिंदे सेनेने ७५ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले असून महापौर पद त्यांच्याकडेच राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या ९ जागांपैकी ७ जागा शिंदे सेनेकडून तर २ जागा भाजपकडून लढवण्यात आल्या होत्या.

शिंदे सेनेकडील संभाव्य चेहरे

शिंदे सेनेतून अनुसूचित जाती प्रवर्गातील सात नगरसेवक विजयी झाले आहेत. यामध्ये प्रभाग ३ (अ) महिला – पद्मा भगत, प्रभाग ६ (अ) महिला – वनिता घोगरे, प्रभाग ७ (अ) महिला – विमल भोईर, प्रभाग ९ (अ) – गणेश कांबळे, प्रभाग १६ (अ) – डॉ. दर्शना जानकर, प्रभाग २४ (अ) महिला – आरती गायकवाड आणि प्रभाग २८ (अ) – दीपक जाधव यांचा समावेश आहे. त्यामुळे या सातपैकी कोणाच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याशिवाय कोपरी येथील सर्वसाधारण प्रभागातून निवडून आलेल्या शर्मिला पिंपोळकर यांचेही नाव चर्चेत असल्याची माहिती असून, राजकीय समीकरणांमध्ये बदल झाल्यास त्यांना संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भाजपला संधी मिळाल्यास हे चेहरे पुढे

युतीचा धर्म लक्षात घेता भाजपने महापौर पदावर दावा केला असून शिंदे सेनेसमोर तशी भूमिका मांडल्याचे सांगितले जात आहे. जर भाजपच्या वाट्याला महापौर पद गेले, तर अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडून आलेले भाजपचे दोन नगरसेवक चर्चेत आहेत. प्रभाग क्रमांक १५ (अ) मधून सुरेश कांबळे तर प्रभाग २२ (अ) महिला मधून उषा वाघ यांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे भाजपकडून यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

Web Title : ठाणे महापौर पद अनुसूचित जाति के लिए आरक्षित; राजनीतिक हलचल तेज

Web Summary : ठाणे का महापौर पद अनुसूचित जाति के लिए आरक्षित हुआ। शिवसेना एकनाथ शिंदे गुट सात संभावित उम्मीदवारों के साथ आगे है। भाजपा भी गठबंधन के फैसलों के बीच दो संभावित नामों के साथ पद पर नजर रख रही है। राजनीतिक गलियारों में चर्चा तेज।

Web Title : Thane Mayor Post Reserved for SC; Political Activity Intensifies

Web Summary : Thane's mayor post is now reserved for Scheduled Caste. Shiv Sena Eknath Shinde faction leads with seven potential candidates. BJP also eyes the position with two possible names, pending alliance decisions. Discussions intensify within political circles.