भिवंडीतील मुंबई नाशिक महामार्गावर कंटेनर उलटल्याने प्रचंड वाहतूक कोंडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 15:29 IST2025-10-12T15:28:37+5:302025-10-12T15:29:19+5:30
हा कंटेनर रस्त्याच्या मधोमध आडवा पडल्याने भिवंडीहून ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत विरुद्ध दिशेने वाहने सोडण्यास सुरुवात केली आहे. मात्र वाहन चालक नियमांचे पालन करत नसल्याने दोन्ही बाजूंच्या रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.

भिवंडीतील मुंबई नाशिक महामार्गावर कंटेनर उलटल्याने प्रचंड वाहतूक कोंडी
नितीन पंडित
भिवंडी: मुंबई नाशिक महामार्गावरील ओवळी माणकोली रस्त्याजवळील आर डी ढाबा येथे कंटेनर उलटल्याने भिवंडीवरून ठाण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. हा कंटेनर रस्त्याच्या मधोमध आडवा पडल्याने भिवंडीहून ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत विरुद्ध दिशेने वाहने सोडण्यास सुरुवात केली आहे. मात्र वाहन चालक नियमांचे पालन करत नसल्याने दोन्ही बाजूंच्या रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.
या दुर्घटनेत कंटेनर चालकासह कंटेनर मधील इतर तीन जणांना दुखापत झाली असून उपचारासाठी त्यांना रुग्णालयात पाठवले असून हायड्रा व इतर साहित्याचे मदतीने उलटलेला कंटेनर रस्त्याच्या बाजूला करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून नागरिकांनी व प्रवाशांनी पोलीस प्रशासनात सहकार्य करावे असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात येत आहे.