भिवंडीतील कनेरी परिसरात कापडाचे गोदाम आगीमुळे जळून खाक, ६ बकऱ्यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 19:32 IST2026-03-02T19:30:25+5:302026-03-02T19:32:29+5:30

आगीच्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे

Massive fire breaks out at cloth godown kaneri area of Bhiwandi 6 goats killed | भिवंडीतील कनेरी परिसरात कापडाचे गोदाम आगीमुळे जळून खाक, ६ बकऱ्यांचा मृत्यू

भिवंडीतील कनेरी परिसरात कापडाचे गोदाम आगीमुळे जळून खाक, ६ बकऱ्यांचा मृत्यू

भिवंडीच्या कनेरी परिसरात कपडे, चिंधी व धागा कोन (यार्न) साठवणूक गोदामात अचानक आग लागल्याने संपूर्ण गोदाम पूर्णतः जळून खाक झाले. या आगीत गोदामात बांधून ठेवलेल्या ६ बकऱ्यांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. तसेच एका बकरीला वाचवण्यात यश आले आहे. आगीच्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ग्राउंड प्लस वन इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील गोदामात अचानक आग लागली. आग वेगाने पसरल्याने काही वेळातच संपूर्ण गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. घटनेची माहिती मिळताच भिवंडी अग्निशमन दलाच्या तीन दमकल गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या व जवानांनी मोठ्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत गोदामातील लाखो रुपयांचा माल, कपडे, चिंधी, धागा कोन व यंत्रसामग्री जळून नष्ट झाली होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही मनुष्यहानी झाली नाही.

आगीत जीवितहानी नाही, पण बकऱ्यांचा मृत्यू

या गोदामात काही बकऱ्या बांधून ठेवण्यात आल्या होत्या आणि गोदामात लागलेल्या या आगीमुळे ६ बकऱ्यांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली. तर एका बकरीला वाचवण्यात यश आले. या आगीचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून, शॉर्टसर्किटची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलीस व अग्निशमन विभाग पुढील तपास करत आहे.

Web Title : भिवंडी: कपड़े के गोदाम में आग, बकरियों की मौत

Web Summary : भिवंडी के कनेरी इलाके में कपड़े के गोदाम में आग लगने से छह बकरियों की दर्दनाक मौत हो गई। दमकल कर्मियों ने आग पर काबू पाया, जिससे कोई जनहानि नहीं हुई। आग लगने का कारण शॉर्ट सर्किट बताया जा रहा है।

Web Title : Bhiwandi: Fire Destroys Cloth Warehouse, Goats Killed

Web Summary : A fire in Bhiwandi's Kaneri area completely destroyed a cloth warehouse, tragically killing six goats. Firefighters extinguished the blaze, preventing human casualties. The cause is under investigation, with a short circuit suspected.