शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
3
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
4
"मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
5
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
6
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
7
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
8
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
9
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
10
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
11
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
12
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
13
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
14
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
15
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
16
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
17
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
18
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
19
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
20
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद

Mansukh Hiren Murder Case: मनसुख प्रकरणात एटीएसची प्रतिष्ठा पणाला!

By जितेंद्र कालेकर | Published: March 21, 2021 10:36 PM

मनसुख हिरेन कथित हत्या प्रकरणात राज्य दहशतवादविरोधी पथकाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळेच या प्रकरणाचा तपासही राष्टÑीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) जाऊ नये म्हणून हालचालींना वेग आला आहे.

ठळक मुद्दे एनआयएकडे खूनाचा तपास जाऊ नये म्हणून हालचालींना वेग

जितेंद्र कालेकर

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: मनसुख हिरेन कथित हत्या प्रकरणात राज्य दहशतवादविरोधी पथकाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळेच या प्रकरणाचा तपासही राष्टÑीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) जाऊ नये म्हणून हालचालींना वेग आला आहे. या खूनातील पाळेमुळे शोधून काढण्याचे आदेश एटीएसचे प्रमुख जयजित सिंग यांनी रविवारी एटीएसच्या पथकाला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.याच पार्श्वभूमीवर या खूनाच्या कटातील दोन आरोपींना अतिरिक्त पोलीस आयुक्त शिवदीप लांडे यांच्या पथकाने अटक केली. एकीकडे एनआयएने मुंबईतील अंटालिया इमारतीजवळ मिळालेल्या स्फोटकांच्या कारच्या गुन्हयात मुंबईच्या गुन्हे गुप्त वार्ता विभागाचे तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक केली. पाच कारही जप्त केल्या. पाच लाखांपेक्षा अधिक रोकडही जप्त केली. त्यापाठोपाठ या प्रकरणामुळे मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचीही राज्य सरकारला उचलबांगडी करावी लागली. त्यानंतर मनसुख यांच्या हत्येतही वाझे यांचा सहभाग होता किंवा कसे? याचाही तपास एनआयएच्या अधिकाऱ्यांकडून सुरु झाला होता. त्याचा घटनाक्रमही एनआयएच्या अधिकाऱ्यांनी जाणून घेण्यास सुरुवात केली होती. इकडे एटीएसच्या अधिकाºयांकडे काहीच हाती लागत नसल्यामुळे स्फोटकांच्या तपासाबरोबरच हाही तपास एनआयएकडे जातो की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली होती. तोपर्यंत एनआयए हा तपास घेत असल्याचे वृत्तही आले. अखेर राज्याचे एटीएस प्रमुख जयजित सिंग यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त शिवदीप लांडे आणि उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्यात शुक्रवारी झालेल्या बैठकीमध्ये या प्रकरणाचा कसून तपास करण्याचे आदेश देण्यात आले. गेली तीन दिवस हे अधिकारी ठाण्यात तळ ठोकून होते. अखेर या प्रकरणाचा काही अंशी छडा लावण्यात यश आले. त्यातील दोघांना रविवारी अटक करण्यात आली. आता हा तपास काही प्रमाणातच बाकी असल्यामुळे तो एटीएसकडेच ठेवण्यात यावा, त्याचवेळी एनआयएला यासंदर्भात लागणारे कोणतेही सहकार्य एटीएसकडून केले जाईल, असेही बोलले जाते. त्यामुळे संपूर्ण प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या प्रकरणाचा आणखी सखोल आणि चांगल्या प्रकारे तपास करण्याचे आदेश जयजित सिंग यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

‘अति संवेदनशील मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात एटीएसच्या पथकाला यश आले आहे. एटीसच्या सर्व सहकाºयांना मनापासून सॅल्यूट आहे. आतापर्यंतच्या पोलीस सेवेच्या करियरमधील सर्वात अवघड केसपैकी ही एक केस आहे.’शिवदीप लांडे, अतिरिक्त पोलीस आयुक्त, एटीएस 

 

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीAnti Terrorist Squadएटीएस