शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमकी देणारा अटकेत; समाजमाध्यमांवर शिवीगाळ, मारण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 07:19 IST

हितेश प्रकाश धेंडे याने समाज माध्यमांवर एक चित्रफित प्रसारित केली होती

लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समाज माध्यमांवर शिवीगाळ करत मारण्याची धमकी देणाऱ्या हितेश प्रकाश धेंडे (२६) याला अटक केल्याची माहिती श्रीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गुलजारीलाल फडतरे यांनी साेमवारी दिली. कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील एका सुरक्षा रक्षकाने धेंडेला मारहाण  केल्यानंतर ‘हम एकनाथ शिंदेजी के आदमी है’ असे सुनावल्यामुळे आपण ही धमकी दिल्याची कबुली त्याने दिली. 

रविवारी हितेश याने समाज माध्यमांवर एक चित्रफित प्रसारित केली. यामध्ये त्याने शिंदे यांना शिवीगाळ करत ठार मारण्याचीही धमकी दिली. ही चित्रफित प्रसारित होताच, ठाण्यात शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला. वागळे इस्टेट भागातील शिंदेसेनेचे पदाधिकारी परेश चाळके यांच्या कार्यकर्त्यांनी  रविवारी रात्री श्रीनगर पोलिस ठाण्यात शिंदे यांना धमकी देणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. याप्रकरणी पोलिसांनी हितेशविरोधात गुन्हा दाखल केला. हितेश हा वागळे इस्टेट येथील वारलीपाडा भागात वास्तव्याला आहे. हा परिसर  शिंदे यांच्याच कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात येतो. दरम्यान, गुन्हा दाखल होताच पोलिसांनी सोमवारी त्याला अटक केली. 

पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची

  • हितेशचे नववीपर्यंत शिक्षण झाले. त्याच्याविरुद्ध यापूर्वीही हाणामारीचे गुन्हे दाखल आहेत. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे आई धुणी-भांडी करण्याचे काम करते. 
  • त्याच्याकडे माेबाइलही नसल्यामुळे त्याने मित्राचा माेबाइल काॅल करण्याच्या बहाण्याने रविवारी घेतला. त्यावरच स्वत:चे इन्स्टाग्राम खाते सुरू केले. त्याच खात्यावर त्याने उपमुख्यमंत्री शिंदे यांना शिवीगाळ करत मारण्याचीही धमकी दिल्याचे तपासात उघड झाले. 
टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेArrestअटकSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम