Video : खळ्ळ खट्याक! भिवंडीतील मालोडी टोल नाका मनसे कार्यकर्त्यांनी फोडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 15:50 IST2021-08-20T15:50:00+5:302021-08-20T15:50:45+5:30
MNS vandalised Toll Naka : मनसे कार्यकर्त्यांची पाठ फिरताच गुरुवारीच टोल वसूल करणाऱ्या सुप्रीम कंपनीने हा टोल नाका पुन्हा सुरु केला होता.

Video : खळ्ळ खट्याक! भिवंडीतील मालोडी टोल नाका मनसे कार्यकर्त्यांनी फोडला
नितिन पंडीत
भिवंडी - भिवंडीतील मानकोली अंजुरफाटा चिंचोटी रस्त्याची सध्या दुरावस्था झाल्याने मागील दोन दिवसांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी स्थानिक नागरिकांनी गाव विकास समितीच्या वतीने बुधवारी रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यांनतर गुरुवारी मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्त्यांनी या रस्त्यावरील मालोडी येथील टोल नाका गुरुवारी बंद केला होता. मात्र, मनसे कार्यकर्त्यांची पाठ फिरताच गुरुवारीच टोल वसूल करणाऱ्या सुप्रीम कंपनीने हा टोल नाका पुन्हा सुरु केला होता.
मनसे पदाधिकाऱ्यांनी टोल नाका बंद करूनही कंपनीने हा टोल नाका सुरु केल्याच्या निषेधार्थ मनसे कार्यकर्त्यांनी शुक्रवारी दुपारी मालोडी येथील टोल नाका लोखंडी रॉडच्या साहाय्याने फोडला आहे. रस्त्याची कामे आधी पूर्ण करा मगच टोल नाका सुरु करा अशा घोषणा देखील यावेळी मनसे कार्यकर्त्यांच्या वतीने देण्यात आल्या.
भिवंडीतील मालोडी टोल नाका मनसे कार्यकर्त्यांनी फोडला pic.twitter.com/cPNQoIEQWV
— Lokmat (@MiLOKMAT) August 20, 2021