Vidhan Sabha 2019: जितेंद्र आव्हाडांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पवार येणार ठाण्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 01:33 AM2019-10-01T01:33:35+5:302019-10-01T01:34:09+5:30

घटस्थापना झाली आणि खऱ्या अर्थाने विधानसभा निवडणुकांमध्ये रंग भरण्यास सुरुवात झाली आहे.

Maharashtra Vidhan Sabha 2019: Sharad Pawar will come to Thane to fill Jitendra Awhad's candidate nomination | Vidhan Sabha 2019: जितेंद्र आव्हाडांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पवार येणार ठाण्यात

Vidhan Sabha 2019: जितेंद्र आव्हाडांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पवार येणार ठाण्यात

Next

ठाणे : घटस्थापना झाली आणि खऱ्या अर्थाने विधानसभा निवडणुकांमध्ये रंग भरण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीचे मुंब्रा-कळव्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे मुंब्य्रात येत्या ३ आॅक्टोबर रोजी दाखल होणार आहेत. त्यामुळे याकडे आता समस्त ठाणेकरांच्या नजरा लागल्या आहेत.

तसे शरद पवार हे मागील ५० वर्षांत अशा प्रकारे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काही ठरावीक मंडळींसाठीच हजर असल्याचे दिसून आले आहे. निवडणुकीच्या निमित्ताने प्रचार सभा, रॅली आदींतून ते दिसून येतात. मात्र, एखाद्या उमेदवारासाठी ते हजर राहणे, हे त्या उमेदवाराचे भाग्यच म्हटले जाते.

लोकसभा निवडणुकीत ते नातू पार्थ पवार याच्यासाठीही अर्ज भरण्यासाठी गेले नव्हते. मात्र, आता तर आव्हाडांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ते ठाण्यात दाखल होणार आहेत. ३ आॅक्टोबर रोजी सकाळी १० वाजता त्यानिमित्ताने मुंब्य्रात मिरवणूक काढण्यात येणार आहे. ही मिरवणूक तब्बल दोन तास चालणार असून पवार हे तीत सहभागी होणार असल्याची माहिती राष्टÑवादीच्या वतीने देण्यात आली. एकूणच पवार यांचा आव्हाडांवर किती विश्वास आहे, हे यातून स्पष्ट होत आहे. आव्हाड बोलले म्हणजे पवारच बोलले, असे यापूर्वी दिसत होते. आता ते या उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवसाच्या निमित्ताने अधोरेखित होणार आहे.

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019: Sharad Pawar will come to Thane to fill Jitendra Awhad's candidate nomination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.