शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan sabha 2019 : प्रताप सरनाईकांची उमेदवारी दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 01:48 IST

ओवळा-माजिवडा या विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले शिवसेनेचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी दोन कॅबिनेट मंत्र्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरला.

ठाणे : ओवळा-माजिवडा या विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले शिवसेनेचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी दोन कॅबिनेट मंत्र्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरला. यावेळी कार्यक र्त्यांनी केलेल्या गर्दीमुळे त्या परिसरात वाहतूककोंडी झाल्याचे चित्र पाहण्यास मिळाले.युतीची घोषणा झाल्यानंतर ठाणे लोकसभेतील सर्वात मोठा आणि दोन महापालिकांचे कार्यक्षेत्र असलेल्या या मतदारसंघातून सरनाईकांनी उमेदवारी अर्ज भरला. तो दाखल करण्यासाठी शास्त्रीनगरनाक्यापासून बेथनी हॉस्पीटलच्या बाजूला असलेल्या या मतदारसंघाच्या निवडणूक कार्यालयापर्यंत रॅली काढली होती. यावेळी सरनाईकांसह पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रणजित पाटील, खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र फाटक, आमदार नरेंद्र मेहता आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. या रॅलीमुळे त्याच परिसरातून येजा करणारी वाहने अडकून पडली होती.सरनाईकांनी २००९ मध्ये या मतदारसंघाचा गड राखला होता. तर २०१४ मध्ये शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्टÑवादीने स्वतंत्र निवडणूक लढवली होती. तेंव्हा भाजपाचे संजय पांडे आणि सरनाईकांमधील चुरशीच्या लढतीत ते विजयी झाले होते. यंदा या मतदारसंघातून सेनेतील अनेक दिग्गजांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण पक्षाने सरनाईकांना उमेदवारी देऊन त्यांचे आव्हान थोपवले.ठाणे आणि मीरा-भार्इंदर या महापालिकेच्या कार्यक्षेत्रात असलेल्या मतदारसंघात गेल्या दहा वर्षांत कामे केली आहेत.भविष्यात हा मतदारसंघ आणखी मोठा होणार असून जेवढी कामे अजून करता येतील तेवढी करण्याचा प्रयत्न राहिल. चांगला विरोधक मिळाला तर यंदाही लढत रंगतदार होईल. मात्र, युतीचे या मतदार संघात प्राबल्य असल्याने हा विजय निश्चित असून विजय किती मताधिक्याने होतो हेच पाहावे लागणार आहे.- प्रताप सरनाईक,उमेदवार, शिवसेनापाच वर्षांत युती सरकारने भरपूर कामे केली आहेत. हे काम आता उपयोगात येणार असून मतदार मोठ्या संख्येने युतीच्या उमेदवारांना निवडणून देतील, असा मला विश्वास आहे. राज्यात युतीचे वातावरण असून ठाणे आणि पालघर जिल्ह्यात युतीच्या उमेदवारांचा विजय निश्चित आहे. त्याचबरोबर कल्याण पश्चिम मतदारसंघात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो आदेश देतील तो मानणारे शिवसैनिक आहेत. - एकनाथ शिंदे, पालकमंत्री, ठाणेसरनाईक यांची निवडणूक हे त्यांची एकट्याची नसून सर्वांची आहे. सरनाईक असे एकमेव कुटुंब आहे जिथे सर्व समस्या सुटतात. त्यामुळे ते मोठ्या मताधिक्याने निवडून येतीलच. त्याचबरोबर महायुतीचे सर्वच उमेदवार मोठ्या संख्येने निवडून येतील.- रणजित पाटील,राज्यमंत्रीशांताराम मोरेंचा उमेदवारी अर्ज दाखलभिवंडी : भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार शांताराम मोरे यांना दुसऱ्यांदा शिवसेनेची उमेदवारी मिळाली आहे. पक्षाची यादी जाहीर होताच मंगळवारी मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत दाखल केला.यावेळी खासदार कपिल पाटील, हातमाग महामंडळाचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे ठाणे जिल्हा ग्रामीण प्रमुख प्रकाश पाटील, शिवसेनेचे तालुका प्रमुख विश्वास थळे, भाजपचे तालुका अध्यक्ष पी. के. म्हात्रे, भाजप ठाणे जिल्हा ग्रामीण युवा मोर्चाचे अध्यक्ष श्रीकांत गायकर, जिल्हा परिषद सदस्य कुंदन पाटील, भिवंडी शहापूर संपर्कप्रमुख विष्णू चंदे यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.दरम्यान, भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघातून मनसेचे मनोज गुळवी व समाजवादीचे कार्यकर्ते डॉ. नुरु द्दीन अन्सारी यांनी अपक्ष अर्ज दाखल केले. भिवंडी पश्चिम मतदारसंघातून आतापर्यंत एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नाही.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019ovala-majiwada-acओवाला मजिवाडाShiv Senaशिवसेना