शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
4
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
5
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
6
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
7
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
8
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
9
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
10
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
11
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
12
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
13
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
14
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
15
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
16
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
17
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
18
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
19
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
20
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

Vidhan Sabha 2019: मुंब्रा-कळव्यासाठी भाजप, ठाण्यासाठी सेना आग्रही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 01:20 IST

ठाणे शहर सोडण्यास भाजपचा स्पष्ट नकार : युतीमध्ये वादाची शक्यता

- अजित मांडकेठाणे : ठाण्यात शिवसेना आणि भाजपमध्ये महापालिकेतील काही घटनांमुळे आधीच बिब्बा पडला आहे. परंतु, आता ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ आणि मुंब्रा-कळवा मतदारसंघांवरून शिवसेना व भाजप आक्रमक झाल्याचे दिसत आहे. ठाण्याचा गड असलेला ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ पुन्हा मिळावा, यासाठी शिवसेना आक्रमक झाली आहे. परंतु, कोणत्याही परिस्थितीत हा गड न सोडण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. दुसरीकडे मुंब्रा-कळवा मतदारसंघावर भाजपने दावा करून हा मतदारसंघ शिवसेनेकडून काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यावरून येत्या काही दिवसांत आणखी वादंग निर्माण होऊन युतीमध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ १९९० पासून शिवसेनेकडे होता. परंतु, २०१४ च्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप स्वबळावर लढल्याने शिवसेनेला येथे पराभव पत्करावा लागला. हा पराभव शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागला असून, हा गड पुन्हा मिळवण्यासाठी शिवसेनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी ठाण्यातील पदाधिकारी हा गड पुन्हा शिवसेनेला मिळावा, यासाठी वरिष्ठांकडे फिल्डिंग लावून आहेत. त्यातच, भाजपमध्ये गणेश नाईक आल्याने भविष्यात तेसुद्धा या मतदारसंघाच्या निमित्ताने शिवसेनेला जड जाऊ शकणार आहेत. त्यामुळेच भविष्यात मोठा दगाफटका होण्याआधीच हा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरू आहेत.हा गड शिवसेनेला सोडला तर, भविष्यात ठाणे महापालिकेवरही पाणी सोडावे लागू शकते. त्यामुळे भाजपसुद्धा हा गड सोडण्याच्या मन:स्थितीत नाही. आगामी महापालिका निवडणुकीत ठाण्यात कमळ फुलवायचे, हा भाजपचा अजेंडा आहे. त्यादृष्टीने ठाणे शहर मतदारसंघ भाजपसाठी जमेची बाजू आहे. या पट्ट्यात भाजपकडे नगरसेवकांचे चांगले पाठबळ आहे. त्यामुळे या जोरावर महापालिका निवडणूक सर करायची तयारी भाजपने चालवली आहे. याशिवाय, प्रत्येक महापालिकेच्या ठिकाणी पक्षाचा एक आमदार असावा, असे भाजपचे सूत्र आहे. त्यामुळेच कोणत्याही परिस्थितीत ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला दिला जाणार नाही, हे भाजपने निश्चित केले आहे.दरम्यान, ठाण्यापाठोपाठ मुंब्रा-कळवा मतदारसंघातही आता शिवसेना आणि भाजपमध्ये कलगीतुरा रंगण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. मागील निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेने निवडणूक लढवली होती. भाजपनेही येथे आपले नशीब आजमावले होते. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसची या मतदारसंघावर मजबूत पकड असल्याने दोघांनाही या मतदारसंघावर कब्जा मिळवता आलेला नाही. जितेंद्र आव्हाड या मतदारसंघाचे विद्यमान आमदार असून, या भागात मुस्लिम मतदारांची संख्या मोठी आहे. युती झाल्यास हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. वंचित बहुजन आघाडीच्या मदतीने मुस्लिम मतांचे विभाजन करुन, या मतदारसंघावर कब्जा करण्याचे नियोजन शिवसेनेबरोबरच भाजपनेही आखले आहे. त्यामुळे आता जागा वाटपात हा मतदारसंघ कुणाच्या वाट्याला येतो, हे पाहण्यासारखे राहणार आहे.भाजपने केला मतदारसंघाचा सर्व्हेमुंब्रा-कळव्यावर भाजपनेही दावा केला आहे. काही महिन्यांपूर्वी भाजप नेत्यांनी केलेल्या या मतदारसंघाच्या सर्व्हेच्या आधारावरच त्यांनी हा दावा केला आहे. परंतु, शिवसेना हा मतदारसंघ सोडण्याच्या मन:स्थितीत नाही. ठाण्याच्या बदल्यात मुंब्रा-कळवा असे समीकरण काही जण जुळवत असले तरी, भाजप ठाणे शहर मतदारसंघ सोडण्यास तयार नसल्याने आता वरिष्ठ यावर काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv Senaशिवसेना