शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan sabha 2019 : उल्हासनगरमध्ये उमेदवारीच्या स्पर्धेत आयलानींची बाजी, कलानी कुटुंबाला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 01:52 IST

भाजपच्या उमेदवारीच्या स्पर्धेत कुमार आयलानी यांनी बाजी मारल्याने, ओमी कलानी आउट झाल्याची चर्चा शहरात रंगली आहे.

- सदानंद नाईकउल्हासनगर : भाजपच्या उमेदवारीच्या स्पर्धेत कुमार आयलानी यांनी बाजी मारल्याने, ओमी कलानी आउट झाल्याची चर्चा शहरात रंगली आहे. आयलानी हे शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, ओमी कलानी टीमच्या काही पदाधिकाऱ्यांवर हद्दपारीची कारवाई केल्याने कलानी कुटुंबाच्या राजकीय अस्तित्वास धक्का लागला आहे.उल्हासनगर महानगरपालिका सत्ता हस्तगत करण्यासाठी भाजपने ओमी कलानी टीमसोबत आघाडी केली. मीना आयलानी यांच्या रूपाने भाजपला पहिल्या महापौर मिळाल्या. त्यांचा सव्वा वर्षांचा कालावधी संपल्यानंतर ओमी टीमच्या पंचम कलानी महापौरपदी विराजमान झाल्या. दरम्यान, भाजपच्या उमेदवारीसाठी पक्षाचे शहराध्यक्ष तथा माजी आमदार कुमार आयलानी यांच्यासह ओमी टीमचे प्रमुख ओमी कलानी यांनीही मुलाखत दिल्याने, आयलानी विरुद्ध कलानी असा सामना काही दिवसांपासून रंगला होता. पंचम कलानी यांना उमेदवारीचा शब्द दिल्याचा दावा ओमी टीमकडून सुरुवातीला करण्यात आला. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्याला अवघे दोन दिवस बाकी असताना भाजपने पंचम कलानी यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब न केल्याने कलानी कुटुंबात संशयाची पाल चुकचुकली.भाजपचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कलानी नको, असे साकडे वरिष्ठांना घातले होते. त्यानंतर, आयलानी यांना हिरवा कंदील दिल्याची चर्चा शहरात बुधवारपासून रंगली असून, शुक्रवारी शक्तिप्रदर्शन करून कुमार आयलानी उमेदवारी अर्ज भरणार असल्याचा दावा भाजपच्या गोटातून करण्यात येत आहे. ओमी कलानी यांची विरोधाची धार बोथट करण्यासाठी ओमी टीमच्या काही पदाधिकाऱ्यांवर बुधवारी रात्री हद्दपारीची कारवाई केल्याचीही चर्चा रंगली आहे. याबाबत पोलीस उपायुक्त प्रमोदकुमार शेवाळे यांच्याशी संपर्क साधला असता, १३ जणांवर तडीपारीची कारवाई केल्याची माहिती त्यांनी दिली. संबंधितांना तडीपारीची पत्रे दिली नसल्याने त्यांची नावे उघड करता येत नाही, असेही त्यांनी सांगितले. एकूणच, आयलानी यांना उमेदवारी देऊन कलानी यांचे पंख छाटण्याचे काम भाजपने केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.कलानी कुटुंबाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्हपंचम कलानी यांना उमेदवारी मिळण्याच्या आशेने आमदार ज्योती कलानी यांनी राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा देऊन पंचम कलानी यांचा प्रचारही सुरू केला होता. मात्र, ऐन वेळेवर भाजपने आयलानी यांना उमेदवारी दिल्याने कलानी कुटुंबाच्या राजकीय अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019ulhasnagar-acउल्हासनगर