शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
5
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
6
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
7
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
8
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
9
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
10
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
11
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
12
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
13
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
14
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
15
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
16
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
17
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
18
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
19
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
20
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...

Vidhan Sabha 2019: महायुतीची हवा; बविआ, आघाडीचाही दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 11:43 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक- हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर, विवेक पंडित, राजीव पाटील, प्रदीप शर्मा, विजय पाटील यांच्या नेतृत्वाची कसोटी

- आशिष राणे, हितेन नाईक पालघर/वसई : जिल्ह्यातील शहरी भागातील महत्त्वाचे मानले जाणारे दोन मतदारसंघ म्हणजे नालासोपारा व वसई हे बलाढ्य गणले जातात. किंबहुना जिल्ह्यातील सहा मतदारसंघापैकी या दोन्ही मतदारसंघात बविआची मोठी ताकद आहे. मात्र मागील दोन वर्षांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत व त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत दोन्हीवेळा युतीचा उमेदवार निवडून आला असून यावेळी मात्र येथील वसई, नालासोपारा व बोईसर विधानसभा क्षेत्रात युतीला भरघोस मताधिक्य मिळाले. त्यामुळे सहाजिकच युतीची खास करून शिवसेनेची ताकद वाढली आहे.यापूर्वीचा बविआचा मजबूत बालेकिल्ला म्हणून असलेल्या वसई व नालासोपाऱ्यात यावेळी बविआला पुन्हा एकदा आघाडीला सोबत घेऊन ही निवडणूक लढवावी लागेल, मात्र यावेळी ही लढाई नुसती साधीसुधी व सोपी राहिलेली नाही. बविआचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांच्या राजकीय अस्तित्त्वाची लढाई असेल, किंबहुना युती झाली तर ठाकूर कुटुंबातील कुणीही उभे राहण्याची शक्यता धूसर आहे. बविआमधीलच राजीव पाटील व नारायण मानकर हे दोघे उमेदवार युतीच्या उमेदवारासमोर लढतील,मग नालासोपारा मधून प्रदीप शर्मा असो अथवा वसईतून विवेक पंडित किंवा विजय पाटील एकूणच या सर्वांच्या लढतीलाही ‘करो या मरो’ चे स्वरूप येणार आहे.लोकसभा निवडणुकीत पालघर मतदारसंघाचा शिवसेनेचा हट्ट भाजपला पूर्ण करावा लागला. विधानसभा निवडणुकीतही शिवसेनेची अपेक्षा वाढली आहे. भाजपलाही जास्त जागा हव्या आहेत. वसई पट्ट्यात वर्चस्व असलेल्या हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीसमोर या वेळी अस्तित्त्वाचे आव्हान आहे.पालघर जिल्ह्यÞातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी पालघर, बोईसर, नालासोपारा व वसई हे चार मतदारसंघ मिळावेत, अशी शिवसेनेची मागणी आहे. इच्छुकांची संख्या मोठी असून बंडाळी टाळण्यासाठी दोन्ही पक्षांना शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. आधीच लोकसभा निवडणुकीत वसई व नालासोपारा अशा बालेकिल्ल्यात पिछाडीवर पडलेल्या बहुजन विकास आघाडीला आता नव्याने प्रस्थापित होण्यासाठी यावेळी जोरदार प्रयत्न करणे गरजेचे आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडी वसई, नालासोपारा, बोईसर या मतदारसंघात तर भाजपने विक्रमगड व डहाणू तर शिवसेनेने पालघर मतदारसंघांमध्ये विजय संपादन केला होता. त्यावेळी शिवसेनेचे आमदार कृष्णा घोडा यांचे निधन झाल्यानंतर २०१६ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेतर्फे त्यांचे चिरंजीव अमित घोडा विजयी झाले होते.२०१८ मध्ये खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत पक्षांतर करून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी राज्यमंत्री राजेंद्र गावीत यांची निवड झाली होती.लोकसभेला धक्का ; युतीची वाटचाल सुरू झाली !पालघर जिल्ह्यात हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व होते. २००९ मध्ये पालघर लोकसभा मतदारसंघात ठाकूर यांच्या आघाडीने विजय संपादन केला होता. गेल्या निवडणुकीत तीन आमदार निवडून आले होते. पण पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक आणि गेल्या मे महिन्यात झालेल्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचा उमेदवार मागे पडला. विशेष म्हणजे वसई या बालेकिल्ल्यात ठाकूर यांच्या आघाडीचा उमेदवार पिछाडीवर पडला. यातच बोईसरचे आमदार विलास तरे यांनी शिवसेनेतप्रवेश केला.वसईत उमेदवारीबाबत कमालीची उत्सुकता !वसई मतदारसंघ हा बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला आहे.त्यातच ६० हजारहून अधिक ख्रिश्चन समाजातील मतदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे युतीतर्फे ख्रिश्चन समाजातील उमेदवार रिंगण्यात उतरविण्याची चाचपणी अलिकडे करण्यात आली होती. सामाजिक कार्यकर्ते आणि कवी सायमन मार्टिन यांचे नाव चर्चेत होते. तर काँग्रेसचे प्रदेश सचिव विजय पाटील यांनी गेल्या काही महिन्यांपासून तर प्रचाराला सुरु वातही केली होती.मात्र काँग्रेसने ऐनवेळी ओनिल आल्मेडा यांचे नाव पुढे केले. त्यामुळे नाराज झालेल्या पाटील यांनी शिवसेनेची वाट धरली. आता त्यांना शिवसेनेतून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र यास अपवाद म्हणून माजी आमदार विवेक पंडित या मतदारसंघातून इच्छुक आहेत किंवा नसतीलही. पण त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे.माझे विचार जुळत नाही असे म्हणून पंडित इच्छुक नाही असे जरी पंडित म्हणत असले तरी विजय पाटील यांना पंडितसह इतरही शिवसैनिक व भाजपचे पदाधिकारी आमदारकीचा उमेदवार म्हणून पाहू शकतील का ? ही सुद्धा एक अटकळ आहे. त्यामुळे वसईत हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे पुत्र क्षितीज हे दोन विद्यमान आमदार पुन्हा रिंगणात उतरणार का, युतीची जोरदार लाट असल्याने नारायण मानकर, प्रवीणा ठाकूर यांना बविआकडून पुढे उमेदवार म्हणून घोषित करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.वचपा काढण्याची संधीलोकसभा निवडणुकीत बविआचे शिटी हे चिन्ह गोठविण्यात शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरल्याने बविआने या सर्वांचा वचपा काढण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. बविआचे आमदार क्षितीज ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांची घेतलेली भेट आणि आमदार हितेंद्र ठाकूर यांचे भाजपमधील काही वरिष्ठ नेत्यांचे असलेले संबंध पाहता शिवसेनेवर मात करण्याच्या दृष्टीने या हालचाली तर नाहीत ना?अशी शक्यता वर्तवली जात आहे.बंडखोरीची शक्यताबोईसरमधील बविआचे आमदार विलास तरे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने समीकरण बदलले असून त्यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. सेनेचे जगदीश धोडी,कमलाकर दळवी यांनी तरे यांच्या प्रवेशानंतर त्यांचे सेनेत स्वागत केले असून त्यांनी पक्ष वाढीसाठी प्रथम प्रयत्न करावेत नंतरच त्यांच्या उमेदवारीचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचार करावा असा मेसेज त्यांनी प्रसारमध्यमांद्वारे दिला आहे. त्यामुळे तरे यांना उमेदवारी दिल्यास बंडखोरीची शक्यता आहे.भाजपला कडवी लढत मिळण्याची शक्यताडहाणू विधानसभेवर भाजपचे पास्कल धनारे हे निवडून आले असले तरी लोकसभा निवडणुकीत माकपने बविआला दिलेल्या पाठबळामुळे माकपची ताकद वाढली असून भाजपला मोठी कडवी लढत मिळण्याची शक्यता आहे. विक्रमगड मतदार संघावर माजी आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री विष्णू सवरा हे निवडून आले. त्यांचे मतदारसंघाकडे झालेल्या दुर्लक्षामुळे त्यांच्याबद्दल नाराजी असूनही त्यांचा मुलगा डॉ. हेमंत यांना उमेदवारी मिळावी म्हणून ते आपले वजन वापरत आहेत. प्रकाश निकम यांनी सवरांना कडवी टक्कर दिली होती. यावर्षी पुन्हा उमेदवारीसाठी प्रयत्नशील असले तरी त्यांच्या उमेदवारीची शक्यता कमी असल्याचे शिवसेनेच्या गटातून सांगितले जाते. तर राष्ट्रवादीच्या सुनील भुसारा यांनी कंबर कसली आहे.वसई -नालासोपारात हवा केवळ युतीची !नालासोपारा विधानसभा क्षेत्रात लोकसभा निवडणुकीत मतांची मोठी आघाडी मिळाल्याने भाजप-शिवसेना युतीला हा मतदारसंघ अधिक सुरक्षित आणि आशेचा वाटू लागला आहे.माजी पोलीस अधिकारी आणि चकमकफेम प्रदीप शर्मा यांनी या मतदारसंघातून लढण्याचे आधीच जाहीर केले आहे. यासाठी त्यांनी शिवसेनेत प्रवेश ही केला. तर भाजपचे जिल्हा सरचिटणीस राजन नाईक हे उमेदवारीचे दावेदार असून भाजपने हा मतदारसंघ पूर्वीपासून बांधल्याने भाजपलाच उमेदवारी मिळण्याची आशा होती.त्यातच या मतदारसंघातील उत्तर भारतीय मतदारांची २३ टक्के असलेली संख्या पाहता मतदार म्हणून त्यांची भूमिकाही महत्त्वाची व निर्णायक ठरणार आहे. तरीही युतीची हवा पाहता आणि क्षितीज ठाकूरांच्या जागी राजीव पाटील हे सुद्धा शर्मा यांना आव्हान देऊ शकतात.आघाडीचे गणित काय ?नेहमीप्रमाणे लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दरवेळी पालघर जिल्ह्यातील वसई, नालासोपारा व बोईसर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर आघाडी पक्षाने बविआला सोडल्या आहेत. त्यामुळे वसईत काँग्रेस व राष्ट्रवादी ची ताकद कधी वाढलीच नाही,याउलट ती ठाकूरांच्यामुळेच लयास गेली असे आघाडीतील सांगतात.सध्याचे पक्षीय बलाबलवसई : बहुजन विकास आघाडीनालासोपारा : बहुजन विकास आघाडीबोईसर : बहुजन विकास आघाडीडहाणू : भाजपविक्र मगड : भाजपपालघर : शिवसेनायुतीच्या लाटेमुळेहितेंद्र ठाकूर यांची प्रतिष्ठा पणाला !खरंतर मागील दोन वर्षांत लोकसभा निवडणुकीत बविआचे मताधिक्य सहाही विधानसभा मतदारसंघात कमी-अधिक झाले आणि शिवसेनेला आपली खरी ताकद येथे असल्याचे जाणवले. मात्र नंतर मागे न पाहता युतीचा झंझावात करीत मतदारसंघात युतीची लाट निर्माण केली आणि पोटनिवडणुकीत विजय मिळविला. आज बविआच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावत ठाकूर यांना एक कडवे आव्हान दिले आहे.घोडा यांच्याबाबत नाराजी : पालघर विधानसभा मतदारसंघ सेनेकडे असल्याने आमदार अमित घोडा यांच्याबाबत नाराजी आहे. त्यामुळे श्रीनिवास वनगा, डॉ.विश्वास वळवी,दिनेश तारवी हे इच्छुक रांगेत असल्याने अजूनही उमेदवाराची घोषणा सेनेने केलेली नाही.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस