भाजपच्या बालेकिल्ल्यात सन्नाटा, पक्ष कार्यकर्ते, नगरसेवकांचा हिरमोड

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 01:48 AM2019-11-27T01:48:59+5:302019-11-27T01:49:34+5:30

भाजपने तीन दिवसांपूर्वी सरकार स्थापन केल्यानंतर येथील कार्यकर्ते, नगरसेवकांमध्ये प्रचंड उत्साह होता. फटाके, रॅली, बॅण्डबाजा वाजवून त्यांनी आनंद व्यक्त केला. मात्र, मंगळवारी देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर सन्नाटा पसरला.

Maharashtra Election, Maharashtra Government: silence in BJP's home ground, Disappointment In party workers, corporators | भाजपच्या बालेकिल्ल्यात सन्नाटा, पक्ष कार्यकर्ते, नगरसेवकांचा हिरमोड

भाजपच्या बालेकिल्ल्यात सन्नाटा, पक्ष कार्यकर्ते, नगरसेवकांचा हिरमोड

Next

- अनिकेत घमंडी

डोंबिवली : जनसंघापासून बालेकिल्ला असलेल्या डोंबिवलीतील नागरिकांनी नेहमीच भाजपला कौल दिला. त्यामुळेच केडीएमसीच्या निवडणुकीत भाजपचे आठवरून थेट ४२ नगरसेवक निवडून आले होते. त्यात डोंबिवलीमधील १९ नगरसेवक आहेत. भाजपने तीन दिवसांपूर्वी सरकार स्थापन केल्यानंतर येथील कार्यकर्ते, नगरसेवकांमध्ये प्रचंड उत्साह होता. फटाके, रॅली, बॅण्डबाजा वाजवून त्यांनी आनंद व्यक्त केला. मात्र, मंगळवारी देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर सन्नाटा पसरला.

फडणवीस यांनी शनिवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यातील राजकीय घडमोडींना कलाटणी मिळाली होती. मात्र अवघ्या ७२ तासांमध्ये या घडामोडी उलटल्या आणि सर्वोच्च न्यायालयाने तातडीने बुधवारीच बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिल्यानंतर फडणवीस यांनी राजीनामा दिला. त्यामुळे तीन दिवसांपासून डोंबिवलीत असलेला उत्साह सरुन सर्वत्र शुकशुकाट झाल्याचे दिसून आले.

नगरसेवकांनी प्रभागांमधील कामांकडे लक्ष द्यायला हवे, असे सांगत महापालिकेतून कामे कशी होतील, याकडे लक्ष द्यावे लागणार असल्याचे स्पष्ट केले. जिल्हास्तरावरील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनीही वरिष्ठ पातळीवर घेतल्या जाणाºया निर्णयांवर चर्चा न करता केवळ पक्षासाठी आणि जनसामान्यांसाठी कार्यरत राहणे, हेच आपले कर्तव्य असल्याचे स्पष्ट केले.

काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार किती काळ टिकते, हे बघण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यांच्या आमदारांमध्ये एकी नव्हती, म्हणूनच अजित पवार बाहेर पडले होते. त्यामुळे येणारा काळच काय ते ठरवेल.
- गणपत गायकवाड, आमदार, कल्याण पूर्व

सत्तेसाठी लागणारे आवश्यक संख्याबळ भाजपकडे नव्हते. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला. विरोधात बसूनही जनतेची सेवा करणे हेच ध्येय मानून आम्ही कामाला लागलो आहोत.
- रवींद्र चव्हाण, आमदार, डोंबिवली

देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे. त्यांनी सत्तेसाठी घोडेबाजार करणार नाही, हा जनतेला दिलेला शब्द पाळला. मी सदैव त्यांच्यासोबतच आहे.
- नरेंद्र पवार, माजी आमदार, कल्याण पश्चिम

देवेंद्र फडणवीस यांनी जो निर्णय घेतला आहे, तो योग्य आहे. उल्हासनगरमधील पक्षाचे सर्व कार्यकर्ते फडणवीस यांच्यासोबत आहेत. पक्ष जे सांगेल त्या मार्गाने पुढे जायचेण असे आमचे ठरले आहे.
- कुमार आयलानी, आमदार, उल्हासनगर

देवेंद्र फडणवीस हे आमचे नेते असून त्यांचा निर्णय आमच्यासाठी शिरसावंद्य आहे. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत राहायचे, ही पक्षाची शिकवण आहे. - राहुल दामले, माजी उपमहापौर, केडीएमसी

Web Title: Maharashtra Election, Maharashtra Government: silence in BJP's home ground, Disappointment In party workers, corporators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.