शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019: मुलासाठी आईची माघार; मुलगा आघाडीच्या पाठिंब्यावर अपक्ष लढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 12:27 IST

Maharashtra Election 2019 मुलासाठी आमदार आई अर्ज मागे घेण्याच्या तयारीत

- सदानंद नाईकउल्हासनगर : वडील गणेश नाईक यांच्यासाठी त्यांचे पुत्र संदीप नाईक यांनी ऐरोली मतदारसंघातून माघार घेतल्यानंतर, ठाण्यातील उल्हासनगर मतदारसंघात आई आ. ज्योती कलानी या त्यांचा पुत्र ओमी कलानी यांच्यासाठी माघार घेण्याची शक्यता आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या पाठिंब्यावर आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे ओमी कलानी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. मात्र, याबाबत टीम ओमी कलानीच्या कोअर कमिटीचा अंतिम निर्णय झाला नसल्याचे ते म्हणाले.उल्हासनगर मतदारसंघातून ओमी टीमच्या महापौर पंचम कलानी यांना उमेदवारी देण्याचे आश्वासन भाजपने दिले होते. त्यानंतर, ओमी कलानी व आमदार ज्योती कलानी यांनी पंचम कलानी यांचा धूमधडाक्यात प्रचारही सुरू केला होता. तत्पूर्वी, आमदार ज्योती कलानी यांनी राष्ट्रवादीच्या शहर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मात्र, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दोन दिवसांपूर्वी पंचम कलानी यांच्याऐवजी पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष, माजी आमदार कुमार आयलानी यांना भाजपने उमेदवारी घोषित केली. त्यामुळे कलानी कुटुंब संतप्त झाले. त्यानंतर, ज्योती कलानी यांनी एका रात्रीत राष्ट्रवादीचा एबी फॉर्म आणून उमेदवारी अर्ज दाखल केला. ओमी कलानी यांनीही अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केला.ओमी कलानी यांच्या रॅलीत काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राधाचरण करोतिया, प्रमोद टाले आदी उपस्थित होते. अर्ज छाननीत राष्ट्रवादीतर्फे ज्योती कलानी तर ओमी कलानी अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात राहिले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी तब्येतीचे कारण पुढे करून ज्योती कलानी अर्ज मागे घेणार असून, ओमी कलानी यांना रिंगणात उतरविण्यात येणार आहे.कलानी कुटुंबाचा राष्ट्रवादीसोबत खेळ - गंगोत्रीउल्हासनगर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार म्हणून पक्षाने माझे नाव घोषित केले. पक्षाचा एबी फॉर्म देऊन अर्जही दाखल करण्यास सांगितले. मात्र, दुसऱ्या दिवशी भाजपने घरचा रस्ता दाखविलेल्या कलानी कुटुंबाने राष्ट्रवादीचा एबी फॉर्म आणून माझ्यापूर्वी अर्ज दाखल केला. आता राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवार ज्योती कलानी माघार घेऊन ओमी कलानी यांना अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरविणार आहेत. आघाडीचा पाठिंबा मिळविण्यातही ते यशस्वी होऊ शकतात. एकूणच कलानी कुटुंब राष्ट्रवादीसोबत खेळत असल्याची टीका या पक्षाचे गटनेते भरत गंगोत्री यांनी केली आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019ulhasnagar-acउल्हासनगर