शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

माघी गणोशोत्सव डोंबिवलीतील फेरीवाल्यांच्या पथ्यावर, विरोधीपक्षनेत्यांकडून अधिका-यांची खरडपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2018 4:49 PM

रेल्वे स्थानकापासून 150 मीटर अंतरार्पयत फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास न्यायालयाचे मनाई आदेश असताना या आदेशाचे डोंबिवली पुर्वेकडील भागात सर्रासपणो उल्लंघन होत असल्याचे पहावयास मिळते. मज्जाव केलेल्या परिक्षेत्रत बिनदिककतपणो फेरीवाल्यांचे अतिक्रमण सुरू असताना रविवारी देखील हे चित्र दिसले.

 डोंबिवली -  रेल्वे स्थानकापासून 150 मीटर अंतरार्पयत फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास न्यायालयाचे मनाई आदेश असताना या आदेशाचे डोंबिवली पुर्वेकडील भागात सर्रासपणो उल्लंघन होत असल्याचे पहावयास मिळते. मज्जाव केलेल्या परिक्षेत्रत बिनदिककतपणो फेरीवाल्यांचे अतिक्रमण सुरू असताना रविवारी देखील हे चित्र दिसले. हे वाढते स्तोम पाहता  माघी गणोशोत्सवानिमित्त पथकाला सुट्टी दिली आहे का? अशा शब्दात स्थानक परिसराला लागून असलेल्या राजाजीपथ-रामनगर प्रभागाचे मनसेचे स्थानिक नगरसेवक तथा विरोधीपक्षनेते मंदार हळबे यांनी प्रभाग अधिका-यांची चांगली खरडपट्टी काढली. एल्फीस्टन येथील दुर्घटना आणि उच्च न्यायालयाचे आदेशाप्रमाणो केडीएमसी परिक्षेत्रतील रेल्वे स्थानक परिसरातही 15क् मीटरच्या अंतरार्पयत फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. याची अंमलबजावणी कल्याण आणि डोंबिवली पश्चिम भागात काटेकोरपणो होत असताना डोंबिवली पुर्व भागात मात्र हे ‘आदेश’ महापालिका प्रशासनाकडून धाब्यावर बसविले गेल्याचे दिसते. आधी पर्यायी जागा अशी मागणी डोंबिवलीतील फेरीवाला संघटनांकडून होत असलीतरी ही मागणी कल्याणमध्येही केली जात आहे. तेथील फेरीवाले हटले मग डोंबिवलीतील फेरीवाले न हटण्यामागे नेमके कारण काय? हे मात्र गुलदस्त्यात आहे. मागील महिन्यात कल्याण स्थानकाच्या बाहेरील फेरीवाला अतिक्रमण पाहता आयुक्तांनी क प्रभागाच्या फेरीवाला पथकातील नऊ कर्मचा-यांना तडकाफडकी निलंबित केले होते.

महिना होत नाही तोच त्यांचे निलंबन मागे घेतले गेले असले तरी डोंबिवलीतील निष्क्रीय ठरलेल्या फेरीवाला पथकांवर आणि येथील प्रभाग अधिका-यांवर आयुक्तांची मेहेरनजर का? असा सवाल वास्तव पाहता उपस्थित होत आहे. दरम्यान रविवारी माघी गणोशोत्सवानिमित्त रेल्वे स्थानकाबाहेर प्रवाशांची वाढती गर्दी आणि यात नजीकच्या पदपथांवर, गल्लीबोळांत फेरीवाल्यांचे झालेले अतिक्रमण यात स्थानिक नगरसेवक मंदार हळबे यांचा पारा वाढला आणि त्यांनी थेट ग  प्रभाग अधिकारी परशुराम कुमावत आणि फ प्रभागाचे अधिकारी अमित पंडीत यांना दुरध्वनी करून त्यांची खरडपट्टी काढली. फेरीवाला पथकाला माघी गणपतीची सुट्टी दिली आहे का? कारवाई बंद केली आहे का? फेरीवाले कंट्रोल का होत नाहीत? अशा शब्दात दोघांनाही हळबे यांनी सुनावले. यासंदर्भात लोकमतने दोघांशी संपर्क साधला असता संपर्क झालेल्या ग प्रभागाच्या कुमावत यांनी रविवारी कर्मचारी वर्ग अपुरा असतो त्यात बंदोबस्ताचे पोलिसही कमी असतात त्यामुळे कारवाईला मर्यादा येतात सोमवारपासून बेधडकपणो कारवाई सुरू असेल असे त्यानी सांगितले.  कुमावत यांच्यावर दोन प्रभागांचा भार ग आणि फ हे दोन प्रभाग स्वतंत्र असताना या दोन्ही प्रभागांमधील फेरीवाला हटविण्याची जबाबदारी केवळ परशुराम कुमावत यांच्यावर सोपविण्यात आली आहे. शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आले म्हणून आयुक्तांनी अमित पंडीत यांना या कारवाईच्या जबाबदारीतून वगळले आहे का? अशी चर्चा पालिका वतरुळात सुरू आहे. इतरत्र सर्व प्रभाग अधिकारी फेरीवाला अतिक्रमण हटविण्याच्या मोहीमेत सक्रिय असताना पंडीत यांच्यावरील मेहेरनजर चर्चेचा विषय ठरली आहे.  आठवडाभरात अवमान याचिका अवमान याचिकेची नोटीस देण्यात आली आहे याउपरही वारंवार सूचना करूनही कारवाई होत नसल्याने आठवडाभरात केडीएमसी विरोधात अवमान याचिका न्यायालयात दाखल करणार असल्याची माहीती हळबे यांनी दिली. आमच्याकडून कायदेशीर प्रक्रिया पुर्ण झाली असून लवकरच याचिका दाखल केली जाईल असे ते म्हणाले. 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीkdmcकल्याण डोंबिवली महापालिकाGovernmentसरकार