शंकर मंदिराची दानपेटी चोरण्याचा प्रयत्न; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 13:23 IST2018-07-09T13:23:27+5:302018-07-09T13:23:55+5:30

अरबाज आणि त्यांचे दोन मित्रांच्याविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Lord Shankar temple donation box try to stole by three accused | शंकर मंदिराची दानपेटी चोरण्याचा प्रयत्न; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल 

शंकर मंदिराची दानपेटी चोरण्याचा प्रयत्न; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल 

ठाणे - मुंब्रा येथील शंकर मंदिराच्या बाहेरील लोखंडी दानपेटी फोडून चोरी करणाऱ्या तीन आरोपींविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बलराम प्रसाद मिध्वनराम शर्मा (६९ )  याच्या फिर्यादीवरून मुंब्रा येथील शंकर मंदिराच्या बाहेरील लोखंडी दानपेटीतील पैसे लंपास करण्याच्या उद्देशाने दानपेटी फोडण्याचा प्रयत्न करणारे आरोपी अरबाज आणि त्यांचे दोन मित्रांच्याविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी देखील या आरोपींविरोधात गुन्हे दाखल आहेत याबाबत पोलीस करीत आहेत. यापूर्वी देखील ठाणे जिल्ह्यात मंदिरातून दान पेटी चोरणाऱ्या चोरट्यांच्या कट उधळला असल्याचा अनेक घटना आहेत. भिवंडी, ठाण्यातील काजूपाडा येथे असे प्रकार घडले असून या आरोपींचा त्याच्याशी काही संबंध आहे का? याबाबत सुद्धा चौकशी केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

Web Title: Lord Shankar temple donation box try to stole by three accused