शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

ठाण्यात लॉकडाऊनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुरविणार नागरिकांच्या दारात माफक दरातील कांदे -बटाटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 8:53 PM

संचारबंदीच्या काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून राज्याचे गृहनिर्माण मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी अल्प दरामध्ये तेही अगदी आपल्या घरातच कांदे आणि बटाटे उपलब्ध करुन देण्यासाठी अभिनव संकल्पना राबविली आहे. या योजनेनुसार राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि पदाधिकाऱ्यांनी कांदे- बटाटे पुरवठा करण्याचा हा उपक्रम सुरु केला आहे.

ठळक मुद्देगृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा निर्णयठाण्यातील अनेक गृहसंकुलांमध्ये पुरविले पदाधिकाऱ्यांनी कांदे बटाटे

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: राष्ट्रवादी  काँग्रेसच्या वतीने संचारबंदीच्या काळात ठाणे शहरातील नागरिकांना थेट दारातच माफक दरामध्ये कांदे आणि बटाटे पुरविण्याची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि पदाधिकाºयांनी कांदे- बटाटे पुरवठा करण्याचा हा उपक्रम सुरु केला आहे.ठाणे शहरामध्ये कोरोनाचे ११ रु ग्ण सापडले आहेत. सध्या भारत कोरोनाच्या तिस-या टप्प्यात जाणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये, अशा सूचना राज्य आणि केंद्र शासनाकडून वारंवार केल्या जात आहेत. तरीही जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिक घराबाहेर पडत आहेत. पर्याय नसल्याने नागरिकांना घराबाहेर पडावे लागत असल्याने आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष परांजपे यांनी नाशिक येथील शेतकºयांकडून कांदे आणि बटाटे यांची खरेदी केली आहे. यातून तीन किलो बटाटे आणि दोन किलो कांदे यांची एकत्रित पिशवीच थेट ग्राहकांपर्यंत पोहचविण्याची सुरुवात केली आहे. सध्या बाजारामध्ये कांदा ३० तर बटाटे ४० रु पये दराने विकले जात आहेत. मात्र, राष्ट्रवादीच्या वतीने १८० रुपयांच्या या वस्तू अवघ्या शंभर रुपयांमध्ये पोहचविल्या जाणार आहेत.मंगळवारी दुपारी १२ वाजल्यापासून हा उपक्रम सुरु केला आहे. ३१ मार्च रोजी राष्ट्रवादीचे कोपरी-पाचपाखाडी विधानसभाध्यक्ष नितीन पाटील, ब्लॉक अध्यक्ष समीर पेंढारे, रत्नेश दुबे, निलेश कदम, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विधानसभाध्यक्ष दीपक पाटील, युवक ब्लॉक अध्यक्ष रोहित भंडारी, वॉर्ड अध्यक्ष सुमीत गुप्ता आणि हॉकर्स सेलचे अध्यक्ष सचिन पंधारे आदींनी कांदे-बटाटयाच्या पिशव्या विविध गृहसंकुलांमध्ये वितरीत केल्या आहेत. या उपक्र माला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. शहराच्या विविध भागांमधून दूरध्वनीद्वारे कांदे-बटाट्यांची मागणी करण्यात येत आहे.या संदर्भात शहराध्यक्ष परांजपे यांनी सांगितले की, कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून नागरिकांनी घरातच राहणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळेच मागणी करणा-या प्रत्येक सोसायटी, गृहसंकुल आणि विभागाच्या दारात कांदे-बटाटे पोहचविले जाणार आहे. ज्यांना कांदे-बटाटे यांची गरज असेल, त्यांनी ९३२१८०८०२१ किंवा ०२२-२५३८६४६४ आणि ०२२- २५३८६५६५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही परांजपे यांनी केले आहे.

टॅग्स :thaneठाणेSocialसामाजिकcorona virusकोरोना वायरस बातम्या