शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024: कोलकाता हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
2
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
3
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
4
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
5
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
6
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
7
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
8
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
9
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
10
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
11
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
12
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
13
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
14
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
15
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
16
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
17
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
18
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
19
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
20
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका

लॉकडाऊनमुळे बदलले ठाण्याच्या खाडीचे रुपडे, पाणी झाले नितळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2020 12:02 AM

पक्ष्यांसह मासे, कीटकांच्या संख्येत झाली वाढ, कचरा टाकण्याचे प्रमाण झाले कमी

ठाणे : ठाण्याचे वैभव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे खाडीने लॉकडाऊनच्या काळात अविघटनशील घटकांतून मोकळा श्वास घेतल्याचे निरीक्षण पर्यावरण अभ्यासकांनी नोंदविले. लॉकडाऊनच्या चार ते पाच महिन्यांच्या कालावधीत माणसे बाहेर पडली नसल्याने खाडीत प्लास्टीकच्या पिशव्यांत टाकण्यात येणाºया निर्माल्यांचे प्रमाण, देवी-देवतांच्या प्रतिमा व इतर अविघटनशील पदार्थ खाडीत सोडण्याचे प्रमाण कमी झाले. खाडीत अविघटनशील पदार्थ खूप कमी प्रमाणात गेल्याने पक्ष्यांबरोबर मासे आणि कीटकांच्या संख्येतही वाढ झाल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले.

खाडी संवर्धनाबाबत अनेक पर्यावरण अभ्यासकांकडून जनजागृती केली जाते. तरीही १०० टक्के खाडी ही प्रदूषणविरहित झालेली नाही. त्यात प्लास्टीकच्या निर्माल्यासह इतर अविघटनशील घटकदेखील सर्रास टाकले जातात. खूप मोठ्या प्रमाणात प्लास्टीकसह निर्माल्य खाडीत टाकण्याचे प्रमाण आता कमी होत असले तरी लॉकडाऊनमध्ये याचा परिणाम अधिक जाणवला. लॉकडाऊनआधी निर्माल्य, प्लास्टीक आणि इतर कचरा टाकला जात होता. पिशवीतून निर्माल्य टाकले जात असल्याने प्लास्टीकचा भस्मासूर निर्माल्याबरोबर यायचा. परंतु, लॉकडाऊनमध्ये खाडीने बºयापैकी मोकळा श्वास घेतला. त्याचबरोबर नैसर्गिक सजीव या लॉकडाऊनच्या काळात वाढू लागले, असे निरीक्षण पर्यावरण दक्षता मंडळाचे ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक डॉ. प्रसाद कर्णिक यांनी नोंदविले. मासे आणि कीटकांचे प्रमाणही वाढायला लागले.

खाडीकिनारी कीटकांची संख्या वाढल्याने पक्ष्यांच्या संख्येतही वाढ होऊ लागली. मांसाहाराचे खरकटे आणि न शिजविलेले अन्न प्लास्टीकच्या पिशव्यांतून गटारीत सोडत असल्याने हा कचरा खाडीत येत होता. तेही कमी झाल्याचे ते म्हणाले.खाडीकाठी आणि प्रवाहात असलेले खारफुटीचे जंगल हे एकेकाळचे ठाणे शहराचे वैभव होते. आज ते रसातळास गेले आहे. वाढती लोकसंख्या, शहरीकरण, उंचावलेले राहणीमान, औद्योगिकीकरण, प्लास्टीकचा वाढता वापर यांमुळे तयार होणाºया कचºयाचे प्रमाण व प्रकार वाढत जातात; आणि वेगवेगळ्या समस्या निर्माण होताना दिसतात.

गेल्या पाच महिन्यांपेक्षा अधिक काळ सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे मात्र या समस्या काही प्रमाणात कमी झालेल्या दिसत आहेत. पर्यावरणाबाबत जरी काही प्रमाणात जनजागृती निर्माण झाली असली तरी अजूनही कित्येक लोक निर्माल्य प्लास्टीकसकट खाडीमध्ये टाकत असल्याचे दिसून येते. परंतु, लॉकडाऊनमध्ये फुल मार्केट पूर्णपणे बंद असल्यामुळे पूजेमध्ये फुले वापरण्याचे प्रमाण बºयापैकी कमी झाले.

प्लास्टीकसह निर्माल्य खाडीमध्ये टाकले गेले नसल्यामुळे ठाणे खाडीमध्ये निर्माल्यामुळे होणारे प्रदूषण काही प्रमाणात कमी झालेले दिसून आले आहे. रोहित पक्षी व विविध पक्ष्यांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे, असे मत ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक डॉ. प्रमोद साळसकर यांनी व्यक्त केले.

टॅग्स :thaneठाणे