डोक्यात पाण्याचा जार अडकल्याने सैरावैरा फिरणाऱ्या बिबट्याला जीवदान, तीन दिवसांच्या सर्च ऑपरेशननंतर सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 16:33 IST2022-02-16T16:31:25+5:302022-02-16T16:33:36+5:30
बदलापूर नजीक गोरेगावजवळ डोक्यात जार अडकलेल्या स्थितीत बिबटयाचा बछडा अडकला होता. या स्थितीत तो तहानेन आणि भुकेनं व्याकुळ होईल असा विचार करत वनविभाग आणि "पॉज"ने जीवाचं रान केलं.

डोक्यात पाण्याचा जार अडकल्याने सैरावैरा फिरणाऱ्या बिबट्याला जीवदान, तीन दिवसांच्या सर्च ऑपरेशननंतर सुटका
बदलापूर - बदलापूर नजीक गोरेगावजवळ डोक्यात जार अडकलेल्या स्थितीत बिबटयाचा बछडा अडकला होता. या स्थितीत तो तहानेन आणि भुकेनं व्याकुळ होईल असा विचार करत वनविभाग आणि "पॉज"ने जीवाचं रान केलं. तीन दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर हे पिल्लू सापडल आणि हे सर्च ऑपरेशन फत्ते झालं.
डोक्यात जार अडकलेला..तहानेने भुकेने तो व्याकुळ झाला होता. कुठे जावं हा मार्ग त्याला दिसत नव्हता, त्याची ही अवस्था पाहून काळजीने वनविभागासह प्राणीमित्रानीही जिवाच रान केलं. तीन दिवसांच्या सर्च ऑपरेशन नंतर अखेर तो सापडला आणि ही मोहीम फत्ते झाली.गेल्या काही दिवसांपासून बदलापूर नजीक असलेल्या गोरेगाव परिसरात बिबट्याचा एक पिल्लू सोशल मीडियावर चर्चेचा विषय झालं होतं. अखेर हे पिल्लू सापडल्यानं प्राणिमित्रांकडून आनंद व्यक्त होत आहे.
बिबट्याचं हे पिल्लू साधारण एक वर्षाच आहे. पाणी पिण्यासाठी ते गोरेगाव परिसरात आलं होतं. डोक्यात बाटली अडकल्यान त्याला काहीच खाण शक्य नव्हतं. एका पर्यटकाने त्याचा व्हिडीओ काढला अन त्यानंतर या पिलाचा शोध सुरू झाला. अखेर याच परिसरात काही अंतरावर हे पिल्लू वनविभागाला दिसलं. वनविभागाचे कर्मचारी, पॉजचे स्वयंसेवक भूषण पवार, नीलेश भणगे, नवीन साळवे, ऋषिकेश सुरसे आणि देवेंद्र निलखे यांनी प्लॅस्टिकच्या बरणीत अडकलेल्या बिबट्याच्या पिल्लाला वाचवण्यासाठी मदत केली. तीन दिवस पोटात काही नसल्यानं हे पिल्लू भुकेनं खूप व्याकुळ झालं होतं. भीतीनं थरथर सुद्धा कापत होतं. त्याच्यावर घटनास्थळी जंगलातच उपचार करण्यात आले आणि अशाप्रकारे या पिल्लाचा प्राण वाचवून त्याला जीवनदान देण्यात आलं. या बछड्याला बोरिवलीच्या संजय गांधी उद्यानात नेणार असल्याचं सांगण्यात आलं.