ठाण्यात वकिलाला  ३७ लाखांचा गंडा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 13:33 IST2026-03-16T13:27:48+5:302026-03-16T13:33:27+5:30

याप्रकरणी ठाण्यातील वकिलाने मंगेश लाेखंडे नावाच्या व्यक्तीविरोधात राबोडी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा केला.  

Lawyer robbed of Rs 37 lakhs in Thane | ठाण्यात वकिलाला  ३७ लाखांचा गंडा 

ठाण्यात वकिलाला  ३७ लाखांचा गंडा 

ठाणे : वकिलाकडून  ४० लाख ३० हजार २६१ रुपयांमध्ये खरेदी केलेल्या कारचे केवळ १२ लाख ६१ हजार रुपये दिल्यानंतर उर्वरित ३७ लाख ७९ हजारांची रक्कम परत न करता, तिचा अपहार करून कारही परत न करता फसवणूक केल्याचा प्रकार समाेर आला आहे. याप्रकरणी ठाण्यातील वकिलाने मंगेश लाेखंडे नावाच्या व्यक्तीविरोधात राबोडी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा केला.  

वकिलाला त्यांची  कार विकायची हाेती. त्यांच्या ओळखीतील  गॅरेज चालकाने लाेखंडे यांचा संदर्भ दिला.  करारानुसार ४० लाख ३०  रुपयांमध्ये त्यांच्या कारच्या विक्रीचा व्यवहार ठरला. या कारवर ३९ लाख २९ हजार २६० रुपये इतके बॅंकेचे कर्ज हाेते. या कर्जाचा ९६ हजार ७०० रुपये  कर्जाचा हप्ता हाेता. हा हप्ता भरण्याचे त्यांनी लाेखंडे यांना सांगितले. हप्ते न भरल्यास करारानुसार ही कार पुन्हा वकिलाला परत करण्याचेही ठरले. मात्र फसवणूक केली.

Web Title : ठाणे में वकील को 37 लाख का चूना: कार सौदे में धोखाधड़ी

Web Summary : ठाणे में एक वकील को कार सौदे में 37.79 लाख रुपये का चूना लगा। खरीदार ने 40.30 लाख रुपये में से केवल 12.61 लाख रुपये का भुगतान किया, किश्तें नहीं भरीं और कार भी वापस नहीं की। पुलिस ने मामला दर्ज कर लिया है।

Web Title : Thane Lawyer Duped: Lost ₹37 Lakhs in Car Deal Fraud

Web Summary : A Thane lawyer was defrauded of ₹37.79 lakhs in a car sale deal. The buyer paid only ₹12.61 lakhs of the agreed ₹40.30 lakhs, failed to pay installments, and didn't return the car. Police have registered a case.