शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

२० महिन्यांत पोलीस हेल्पलाइन ३८ हजार वेळा खणखणली, आरटीआयखाली माहिती उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2018 3:08 AM

मागील २० महिन्यांत ठाणे शहर पोलिसांचा हेल्पलाइन क्रमांक जवळपास ३८ हजार वेळा खणखणला, अशी माहिती ठाण्यातील अधिकार फाउंडेशन या संस्थेने केलेल्या माहितीच्या अधिकाराखाली समोर आली आहे.

ठाणे : मागील २० महिन्यांत ठाणे शहर पोलिसांचा हेल्पलाइन क्रमांक जवळपास ३८ हजार वेळा खणखणला, अशी माहिती ठाण्यातील अधिकार फाउंडेशन या संस्थेने केलेल्या माहितीच्या अधिकाराखाली समोर आली आहे. यामध्ये कळवा आणि मुंब्य्रातून सर्वाधिक तक्रारींचे कॉल हेल्पलाइनवर आल्याची माहिती पोलिसांनी फाउंडेशनचे ठाणे जिल्हाध्यक्ष इमरान चौधरी यांनी दिली.ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील नागरिकांच्या मदतीसाठी १०० हा हेल्पलाइन नंबर सुरू झाला. त्यानंतर, २००८ मध्ये महिला, मुले आणि वयोवृद्धांसाठी १०३ हा विशेष हेल्पलाइन नंबर सुरू करण्यात आला आहे. याचदरम्यान, अधिकार फाउंडेशन या संस्थेने २०१३ ते २०१८ पर्यंत ठाणे नियंत्रण कक्षामधील हेल्पलाइन नंबरवर किती तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तर, तक्रारीनंतर किती वेळेत मदतकार्य मिळाले. तसेच तक्रारदारांचा नंबर स्थानिक पोलिसांना दिला जातो का, अशी माहिती माहितीच्या अधिकाराखाली मागितली होती. यावेळी पोलिसांनी २०१३ ते नोव्हेंबर २०१६ दरम्यानच्या तक्रारींबाबत तांत्रिक कारण पुढे केले आहे. त्यानंतर, डिसेंबर २०१६ ते सप्टेंबर २०१८ पर्यंतची माहिती पोलिसांनी फाऊंडेश्नला दिली आहे. त्यानुसार, ठाणे शहर पोलिसांच्या एकूण हेल्पलाइन नंबर १००, १०३, १०९० आणि २५४४३५३५ या नंबरवर ३७ हजार ७८२ तक्रारींचे कॉल आल्याची माहिती दिल्याचे चौधरी यांनी सांगितले. यामध्ये, १०० नंबर या हेल्पलाइनवर ३१ हजार ४६८ तर १०३ या नंबरवर ३९४ कॉल आल्याचा समावेश आहे. तसेच उर्वरित सहा हजार तक्रारी इतर हेल्पलाइन नंबर आल्याचे म्हटले. दरम्यान, १०० आणि १०३ हा नंबर कधीकधी लागत नसल्याचेही चौधरी यांनी सांगितले. तसेच तक्रारीनंतर पोलीस जरी पाच ते सात मिनिटांत पोहोचत असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. मात्र, तेवढ्या वेळेत बऱ्याचदा पोलीस पोहोचण्यात अपयशी ठरल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तर, कळवा आणि मुंब्रा येथून सर्वाधिक जास्त तक्रारी आल्याने त्या परिसरात पोलीस गस्त आणि पोलीस पेट्रोलिंग वाढण्याची मागणी चौधरी यांनी केली आहे.

टॅग्स :Policeपोलिस