शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांना भाजपाने दिले चॉकलेट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2019 2:34 PM

प्रवाशांनी रूळ ओलांडून स्वत:चा जीव धोक्यात घालू नये असे सांगत भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक मुकुंद पेडणेकर यांनी प्रवाशांना चॉकलेट वाटून रूळ न ओलांडण्याचे आवाहन केले.

ठळक मुद्देप्रवाशांनी रूळ ओलांडून स्वत:चा जीव धोक्यात घालू नये असे सांगत भाजपाचे नगरसेवक मुकुंद पेडणेकर यांनी प्रवाशांना चॉकलेट वाटून रूळ न ओलांडण्याचे आवाहन केले.भाजपाच्या कार्यकर्त्यांनी प्रवाशांना हात जोडून विनंती करत रूळ न ओलांडण्याचे आवाहन केले. प्रवाशांनीही सह प्रवाशांना रूळ ओलांडताना थांबवा, जेणेकरून अपघातांचे प्रमाण कमी होण्यास आळा बसेल.

डोंबिवली - मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील कोपर रेल्वे स्थानकात रूळ ओलांडण्याच्या नादात रविवारी तिघांचा मृत्यू झाला होता. त्यामध्ये एका चिमुरड्याचा समावेश होता, ही घटना अत्यंत र्दुदैवी होती. त्यामुळे प्रवाशांनी रूळ ओलांडून स्वत:चा जीव धोक्यात घालू नये असे सांगत भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक मुकुंद पेडणेकर यांनी प्रवाशांना चॉकलेट वाटून रूळ न ओलांडण्याचे आवाहन केले.

उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाने त्या उपक्रमाला पाठींबा दिला होता. मंगळवारी सकाळपासून दुपारपर्यंत भाजपाच्या कार्यकर्त्यांनी प्रवाशांना हात जोडून विनंती करत रूळ न ओलांडण्याचे आवाहन केले. प्रवाशांनीही साथ देत रूळ ओलांडणे मजबूरी असून वेळेत लोकल पकडण्याच्या गडबडीत चुकून पादचारी पूलाकडे न जाता थेट रूळाचा शॉर्टकट वापरला जात असल्याचे सांगितले.

कोपर स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आवाहन करताना भाजपा कार्यकर्त्यांसह प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, आपली घरी कोणीतरी वाट बघत आहे. याची जाणीव लक्षात घ्यावी, आणि रूळ ओलांडू नका. काही मिनिटे वाचवण्यासाठी पादचारी पूलाचा वापर टाळावा. पादचारी पूलामुळे सुरक्षित, सुखद, संरक्षित प्रवासाची हमी मिळते. प्रवाशांनीही सह प्रवाशांना रूळ ओलांडताना थांबवा, जेणेकरून अपघातांचे प्रमाण कमी होण्यास आळा बसेल. ‘सुरक्षा व्यवस्थेवरही प्रचंड ताण असतो, तो ताण कमी करण्यासाठी आपण सगळयांनी सहकार्य करण्याची आवश्यकता असल्याचेही पेडणेकर म्हणाले.

भाजपाच्या उपक्रमामध्ये आरपीएफ डोंबिवलीचेही पोलीस कर्मचारीही सहभागी झाले होते. त्यांनीही अपघात, आपत्कालीन परिस्थितीमध्ये तातडीने १८२ क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन केले. तातडीने जनजागृती व्हावी यासाठी पोलिसांनी १८२ क्रमांकाचे बोर्ड हातात धरले होते. काही प्रवाशांनी मात्र १८२ ही हेल्पलाइन सुविधा नावाला असल्याची टीका केली. काही वेळेस अडचण येऊ शकते, पण ही सुविधा चांगलीच असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले. यावेळी भाजपा पूर्व मंडल अध्यक्ष संजीव बीडवाडकर, अमित कासार, माजी नगरसेवक नरेंद्र पेडणेकर आदींसह युवक, युवती आणि स्वत:हुन प्रवासी आवर्जून उपस्थित होते.

पेडणेकर यांच्या माध्यमातून स्थानकालगत असलेल्या जागेत होर्डिगद्वारेही जनजागृती केली गेली. त्यामध्ये अपघातात मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली, तसेच सुरक्षित प्रवासाचा संदेश देण्यात आला होता. सातत्याने या संदर्भात सुरक्षा अभियान करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पेडणेकर यांनी सांगितले की, २०१२ पासून या स्थानकात एस्कलेटर सुविधा असावी यासाठी विभागीय व्यवस्थापकांना पत्रव्यवहार केला होता. त्या पत्राला केराची टोपली दाखलवली गेली का? असा सवालही त्यांनी केला. या ठिकाणी संरक्षक भिंत उभारावी, अपघात टाळावे यासाठीही पत्रव्यवहार केला होता. तसेच साप येऊ नयेत यासाठी गवत तातडीने काढावेत यासाठी डोंबिवली स्थानक प्रबंधकांना पत्र दिली आहेत, पण रेल्वे प्रशासन कानाडोळा करत असल्याने कोणतीही उपाययोजना कोपर स्थानकासंदर्भात झालेली नाही. या ठिकाणाहून हजारो प्रवासी नित्याने प्रवास करतात. भविष्यात या स्थानकातून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढणार आहे हे देखील प्रशासनाने लक्षात घेणे आवश्यक आहे. रेल्वे पोलिसांनी मात्र त्यांच्या सूचनांकडे गांभीर्याने लक्ष देत, यापुढे ते देखिल वरिष्ठांना तात्काळ उपाययोजना करण्यासंदर्भात तगादा लावणार असल्याचे स्पष्ट केले. 

टॅग्स :BJPभाजपाrailwayरेल्वेlocalलोकलpassengerप्रवासी