शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

थेट भाजपाच्या विरोधात जाऊन भिवंडीचे महापौर होणारे नारायण चौधरी कोण आहे? ‘अशी’ आहे कारकीर्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 17:31 IST

Bhiwandi Mayor Election 2026: भाजपाला थेट आव्हान देत महापौरपदी विराजमान होणारे नारायण चौधरी यांची राजकीय कारकीर्द कशी आहे?

Bhiwandi Mayor Election 2026: भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत भाजपाने स्वकीयांच्याच बंडखोरीचा कडवट अनुभव घेतला आहे. भाजपाचे तब्बल सहा नगरसेवक ऐन निवडणुकीच्या वेळी फुटल्याने भाजपाच्या महापौरपदाच्या अधिकृत उमेदवार स्नेहा पाटील यांचा पराभव झाला. विशेष म्हणजे, या बंडखोर गटाने काँग्रेसप्रणीत 'सेक्युलर फ्रंट'ला उघडपणे साथ दिली. भाजपामधील या अंतर्गत कलहाचा फायदा घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या 'सेक्युलर फ्रंट'ने नारायण चौधरी यांना महापौरपदी बसवून भाजपाला खिंडार पाडले. भाजपाला थेट आव्हान देत महापौरपदी विराजमान होणारे नारायण चौधरी यांची राजकीय कारकीर्द कशी आहे?

चंद्रपूरनंतर भिवंडी महापालिकेत काय होणार, याकडे राज्याचे लक्ष लागले होते. अखेर महापौरपदाची निवड झाली असून सेक्युलर फ्रंटचे पुरस्कृत उमेदवार नारायण चौधरी हे महापौर झाले आहेत.  महापालिकेच्या स्व. विलासरावजी देशमुख सभागृहात दुपारी १२ वाजता सुरू झालेल्या निवडणूक प्रक्रियेनंतर हात वर करून झालेल्या मतदानात चौधरी यांनी स्पष्ट बहुमत मिळवत भाजपाला मोठा धक्का दिला. भिवंडी विकास आघाडीकडून सर्वप्रथम नगरसेवक झालेल्या नारायण चौधरींनी २४ वर्षांच्या राजकीय करिअरमध्ये महापौरपदाला गवसणी घातली. 

भिवंडीचे महापौर होणारे नारायण चौधरी कोण आहे? 

- नारायण चौधरी हे मूळचे भिवंडीतील रहिवाशी असून २००२ पासून त्यांनी राजकीय प्रवासाला सुरुवात केली.

- सर्वप्रथम २००२ मध्ये ते नगरसेवक झाले. २००२ ते २००७ मध्ये त्यांनी भिवंडी विकास आघाडीमधून नगरसेवक म्हणून कारकीर्द सांभाळली. 

- सन २००७ ते २०१२ मध्ये त्यांनी अपक्ष निवडणूक लढवत वेगळा ठसा निर्माण केला. २०१२ मध्ये त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला.

- सन २०१२ ते २०१७ दरम्यान समाजवादी पक्षातून त्यांची पत्नी अलका नारायण चौधरी यांना नगरसेविका म्हणून निवडून आणले.  

- सन २०१७ मध्ये नारायण चौधरी यांनी शिवसेनेत प्रवेश केला.  मात्र, राज्यातील बदललेल्या राजकीय स्थित्यंतरानंतर २०२५ मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला. 

- दोन वर्षाच्या प्रशासकीय राजवटीनंतर नुकतेच झालेल्या भिवंडी महानगरपालिकेतही ते पुन्हा एकदा नगरसेवक म्हणून विजयी झाले. 

- भिवंडीतील परिसरात राहणारे नारायण चौधरी शेतकरी असून त्यांनी सुरुवातीला दुधाचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर बांधकाम व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केले.

- व्यवसाय करतानाच ते राजकीय क्षेत्रातही कामकाज करत होते. आता भिवंडी शहरात सुप्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक म्हणून त्यांची ओळख असून नारायण डेव्हलपर्स नावाने त्यांची कंट्रक्शन कंपनी आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Narayan Choudhari: From Shiv Sena to Mayor, defying BJP in Bhiwandi.

Web Summary : Narayan Choudhari became Bhiwandi's mayor, backed by Congress, after BJP infighting. A former Shiv Sena member, he's a builder who previously served as a corporator, defeating the BJP candidate. He has switched parties over the years and has been a councilor since 2002.
टॅग्स :Bhiwandi Nizampur Municipal Corporation Electionभिवंडी-निजामपूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६MayorमहापौरBhiwandiभिवंडीBJPभाजपा