शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

Kirit Somaiyya: 'संजय राऊतांच्या मुलीच्या पंचतारांकीत लग्नसोहळ्याचे बिल कुणी भरले?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 16:31 IST

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या मुलीच्या विवाहसोहळा एका पंचतारांकित हॉटेलमध्ये साजरा झाला. या सोहळ्यातील कार्यक्रमांचे लाखो रुपयांचे बिल कोणी भरले, असा प्रश्नही किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे

ठाणे/मुंबई - शिवसेना आणि भाजप वाद चांगलाच विकोपाला पोहोचला आहे. सध्या गोव्यात राजकीय वातावरण तापल असून पर्यावरणमंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनीही भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली. तर, खासदार संजय राऊत हे भाजपशी दैनिक सामना करताना दिसत आहेत. हमने बहुत बरदाश्त किया है ना.. तो बरबाद भी हम ही करेंगे, अशा शब्दांत राऊत यांनी भाजपला रोखठोक इशारा दिला. उद्या शिवसेना भवनात पत्रकार परिषद होईल, अशा इशाराही त्यांनी भाजपला दिला. दुसरीकडे भाजप नेते किरीट सोमय्यांनी पुन्हा एकदा संजय राऊत यांना लक्ष्य केलं आहे. 

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या मुलीच्या विवाहसोहळा एका  पंचतारांकित हॉटेलमध्ये साजरा झाला. या सोहळ्यातील कार्यक्रमांचे लाखो रुपयांचे बिल कोणी भरले, असा प्रश्नही किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे. सोमय्या हे नगरसेवक संजय वाघुले यांच्या कार्यालयात आले असता, तिथे कार्यकर्त्यांबरोबर त्यांनी संवाद साधला. यावेळी, पुणे येथील कोविड सेंटरमधील भ्रष्टाचारावरही त्यांनी भाष्य केलं. या जम्बो कोविड सेंटरमधील आपण गैरव्यवहाराविरोधात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे सर्व पुरावे देण्यात आले आहेत. मात्र, अद्याप कुठलिही कारवाई नाही. विशेष म्हणजे काळ्या यादीत टाकलेल्या लाइफ लाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सव्‍‌र्हिसेस या कंपनीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनीच पाच कोविड सेंटरचे कंत्राट दिल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. 

सरनाईकांना २१ कोटी भरावेच लागतील

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या विहंग गार्डनला माफी दिली, तरी त्यांना २१ कोटी रुपये भरावे लागतील. त्यासाठी भाजपकडून कायदेशीर लढाई लढली जाईल, असेही त्यांनी सागितले. 

उद्या पत्रकार परिषदेत उत्तर देऊ

केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. शिवसेना नेते, ठाकरे कुटुंबावर सातत्यानं चिखलफेक सुरू आहे. आरोप केले जात आहेत. या सगळ्या आरोपांना उद्या आम्ही शिवसेना भवनातून उत्तर देऊ. उद्या काय होतं ते पाहाच. प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते. ती मर्यादा त्यांनी ओलांडली आहे. आता पुढे काय होतंय ते बघा, अशा शब्दांत राऊत यांनी भाजपला इशारा दिला.

भाजपचे साडेतीन लोकं कोठडीत असतील

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांपाठोपाठ महाविकास आघाडीचे मंत्री तुरुंगात जातील. त्यांच्या कोठडीच्या बाजूला त्यांची जागा असेल असं भाजपचे नेते सांगत असतात. पण पुढील काही दिवसांत भाजपचे साडेतीन लोक त्याच कोठडीत असतील आणि देशमुख बाहेर असतील. राज्यात सरकार आहे ही गोष्ट लक्षात घ्या आणि ते सरकार शिवसेनेच्या नेतृत्त्वाखालील आहे ही गोष्ट ध्यानात ठेवा, असा गर्भीत इशाराच राऊत यांनी दिला. 

 

टॅग्स :Kirit Somaiyaकिरीट सोमय्याSanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाmarriageलग्न